शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

मुरूमगावात पुन्हा १२ लाख रुपयांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2019 23:48 IST

धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी पुन्हा १२ लाख १६ हजार रुपयांची दारू गुरूवारी जप्त केली आहे. सदर दारू मुरूमगाव येथील दारू विक्रेता व्यंकटेश बहिरवार याच्या मालकीची असून त्याने ही दारू शेतातील एका खड्ड्यात माती झाकून ठेवली होती.

ठळक मुद्देमहिलांचा एल्गार : दारू विक्रेत्याने स्वत:च्या शेतात ठेवली होती गाडून; मुक्तीपथचे मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कमुरूमगाव : धानोरा तालुक्यातील मुरूमगाव येथील महिलांनी पुन्हा १२ लाख १६ हजार रुपयांची दारू गुरूवारी जप्त केली आहे. सदर दारू मुरूमगाव येथील दारू विक्रेता व्यंकटेश बहिरवार याच्या मालकीची असून त्याने ही दारू शेतातील एका खड्ड्यात माती झाकून ठेवली होती.मुक्तीपथच्या नेतृत्वात मुरूमगावातील महिलांनी गाव दारूमुक्त करण्याचा निर्धार केला आहे. ४ जुलै रोजी बहिरवार याचीच चार लाख रुपयांची दारू जप्त केली होती. त्यानंतर पुन्हा त्याने शेतातील जमिनीत दारूने भरलेले पोते गाडून ठेवले असल्याची गोपनिय माहिती महिलांना प्राप्त झाली. त्याच्या शेताची तपासणी केली असता, दारू आढळून आली. ३० चुंगळ्यांमध्ये ७ हजार ६०० बॉटल आढळून आल्या. याची किंमत १२ लाख १६ हजार रुपये होते. महिलांना बघताच बहिरवार याने पळ काढला. महिलांनी दारू पोलिसांच्या स्वाधीन केली आहे. सदर कारवाई जि.प. सदस्य लता पुंगाटी, सरपंच प्रियंका नैताम, उपसरपंच शिवप्रसाद गवरना, मुनीर शेख, सायरा बेगम शेख, विमल मडावी, पार्वती फिरकी, सरपंच हरीश दुर्वे, पार्वती गवरना, प्रेमिला कोटपरीया, लिलाबाई धूरपुरीया, बिंदीया मडकाम, पुष्पा कोटवार, प्रतिभा उईके आदींनी केली. यासाठी मुक्तीपथचे संघटक सागर गोतपाखर, प्रेरक अक्षय पेद्दिवार, पराग मगर यांनी महिलांना मार्गदर्शन केले.भंगार साहित्याच्या आड दारूची वाहतूकदेसाईगंज : गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव मार्गे देसाईगंजकडे पिवळ्या रंगाच्या वाहनातून दारूची वाहतूक होत असल्याची गोपनिय माहिती देसाईगंज पोलिसांना प्राप्त झाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी कुरखेडा मार्गावरील टी पॉर्इंटजवळ सापळा रचला. वाहनाची तपासणी केली असता, वाहनात ३६ हजार रुपये किमतीची दारू आढळून आली. वाहनाची किंमत १ लाख ५० हजार रुपये एवढी आहे. दारू व वाहन असा एकूण १ लाख ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. वाहन चालक अनिल हजारे रा. नांदगाव खोडे ता. बल्लारशहा याच्या विरोधात देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.

टॅग्स :liquor banदारूबंदी