शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत ११ जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत टाकले शस्त्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 13:43 IST

Nagpur : दंडकारण्यात माओवादी संघटनेला गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (१० डिसेंबर) आणखी एक मोठा हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत एकूण ११ जहाल माओवादींनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दंडकारण्यात माओवादी संघटनेला गडचिरोली पोलिसांनी बुधवारी (१० डिसेंबर) आणखी एक मोठा हादरा दिला. पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या उपस्थितीत एकूण ११ जहाल माओवादींनी शस्त्रांसह आत्मसमर्पण केले. आत्मसमर्पण करणाऱ्यांवर राज्य शासनाने एकूण ८२ लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. या ११ माओवाद्यांत चार महिला असून, तीन दाम्पत्याचा समावेश आहे.

या माओवादींत २ डिव्हिजनल कमिटी सदस्य, ३ प्लाटून कमिटी सदस्य, २ एरिया कमिटी सदस्य आणि ४ सक्रिय सदस्यांचा समावेश आहे. चार माओवादी आत्मसमर्पणाच्या वेळी माओवादी गणवेशात होते. अपर पोलिस महासंचालक (विशेष कृती) डॉ. छेरिंग दोरजे, उपमहानिरीक्षक अंकित गोयल, सीआरपीएफचे उपमहानिरीक्षक अजय शर्मा, पोलिस अधीक्षक नीलोत्पल, अपर अधीक्षक एम. रमेश व कार्तिक मधिरा, उपअधीक्षक विशाल नागरगोजे आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमात पोलिस महासंचालक शुक्ला म्हणाल्या, दंडकारण्यात शांतता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. उर्वरित माओवाद्यांनीही मुख्य प्रवाहात सामील व्हावे. प्रास्ताविक पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी केले, तर आभार अपर अधीक्षक एम. रमेश यांनी मानले.

आत्मसमर्पण करणाऱ्यांत यांचा आहे समावेश

आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये भामरागड, बस्तर व एओबी क्षेत्रात काम पाहणाऱ्या महत्त्वाच्या कॅडरचा समावेश आहे.त्यात डीव्हीसीएम रमेश ऊर्फ भीमा लेकामी, किरण हिडमा, पीपीसीएम लक्की अडमा, रतन ओयाम, कमला वेलादी, एसीएम कुमारी वेलादी, रामजी पुंगाटी, सोनू पोडीयाम, प्रकाश पुंगाटी, सीता पल्लो, साईनाथ मडे या माओवाद्यांचा समावेश आहे.६७ लाख रुपये पुनर्वसनासाठी या सर्वांना आत्मसमर्पण केल्यानंतर शासनाकडून मिळणार आहेत.

 

English
हिंदी सारांश
Web Title : 11 Maoists Surrender in Gadchiroli; Lay Down Arms

Web Summary : Eleven hardcore Maoists, including women and couples, surrendered with weapons in Gadchiroli before DGP Rashmi Shukla. The surrendered Maoists carried a total bounty of ₹82 lakhs. The state government will provide ₹67 lakhs for their rehabilitation. Others are urged to join the mainstream.
टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली