शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

११ रेती तस्करांना एक वर्षाचा कारावास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2019 00:10 IST

तालुक्यातील अलोणी रेतीघाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ११ आरोपींना न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास व ५५ हजार १०० रुपये दंडाची शिक्षा ६ जून रोजी सुनावली आहे.

ठळक मुद्दे५५ हजारांचा दंड : बोदली मेंढा, इंदिरानगर, माडेतुकूमातील आरोपी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील अलोणी रेतीघाटातून रेतीची अवैध वाहतूक करणाऱ्या ११ आरोपींना न्यायालयाने एक वर्षाचा सश्रम कारावास व ५५ हजार १०० रुपये दंडाची शिक्षा ६ जून रोजी सुनावली आहे.दिवाकर राजेश्वर पिपरे (३६) रा. बोदली मेंढा, मुकेश सधाकर नैताम (२६) रा.माडेतुकूम, सुशील दिवाकर कोठारे (३१) रा.इंदिरानगर, किरण शंकर कोहळे (२६) रा.व्याहाड (बुज), प्रवीण प्रभाकर चापडे रा.हनुमान वॉर्ड गडचिरोली, अरूण सुखदेव पिपरे रा.लांझेडा, हेमंत वसंतराव सोमनकर (४०) रा.लांझेडा, गणेश रामकृष्ण भुरले (२३) रा.माडेतुकूम, जितेंद्र रमेश भांडेकर (२७) रा.माडेतुकूम, चेतन तुकाराम गडपल्लीवार (२३) रा.बोदली मेंढा, श्यामलता विनोद दुग्गा रा.बेलगाव ता.धानोरा अशी आरोपींची नावे आहेत.या ११ आरोपींनी संगणमत करून अलोणी येथील रेतीघाटातील रेती अवैधरित्या वाहतूक करीत असल्याची माहिती तहसील कार्यालयाला प्राप्त झाली. तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी माडेतुकूम ते बोदली मार्गावर थांबले असता, पाच ट्रॅक्टर रेतीची वाहतूक करीत होते. या रेती तस्करांकडे परवाना नव्हता. त्यामुळे गडचिरोलीचे मंडळ अधिकारी सोमेश्वर सुखरू बारसागडे यांनी गडचिरोली पोेलीस स्टेशनमध्ये २० एप्रिल २०१७ रोजी गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. त्यानुसार आरोपींविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला.पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र बेलदार यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. आरोपींविरोधात सबळ पुरावे आढळल्याने मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम.पाटील यांनी आरोपींना कलम ३७९/३४ अन्वये एक वर्ष सश्रम कारावास व प्रत्येकी पाच हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास प्रत्येकी एक महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा दिली.सरकारी पक्षातर्फे सहायक सरकारी अभियोक्ता योगीता राऊत यांनी काम पाहिले तर कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हवालदार यशवंत मलगाम, कोर्ट मोहरर सुभाष सोरते यांनी जबाबदारी सांभाळली.रेती तस्कर धास्तावलेरेती तस्करांना शिक्षा होण्याची ही जिल्ह्यातील कदाचित पहिलीच वेळ असावी. रेती तस्करी करताना एखादा ट्रॅक्टर आढळून आल्यास त्याच्यावर महसूल विभाग दंड ठोठावते तर काही महसूल कर्मचारी पाच-दहा हजार रुपयांची चिरिमिरी घेऊन मोकळे होत होते. शिक्षा होत नसल्याने रेती तस्कर निर्ढावले होते. पैशाच्या बळावर प्रशासकीय यंत्रणा बांधून ठेवता येते, असा समज त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला होता. मात्र न्यायालयाने त्यांना दंडाबरोबरच कारावासीचीही शिक्षा सुनावली आहे. या शिक्षेमुळे इतर रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. किमान अशा निकालांमुळे तरी रेती तस्करीला आळा बसेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. 

टॅग्स :sandवाळू