शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

१०५ जोडपी होणार विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:39 IST

मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देआज गडचिरोलीत सोहळा : पोलीस विभाग व मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : मैत्री परिवार संस्था नागपूर, जिल्हा पोलीस विभाग, धर्मदाय आयुक्त नागपूर विभाग व साईभक्त, साई सेवक परिवार नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली येथील मूल मार्गावरील अभिनव लॉन येथे २९ एप्रिल रोजी रविवारी सकाळी १० वाजता जोडप्यांचा विवाह सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या विवाह सोहळ्यात १०५ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यामध्ये दोन आत्मसमर्पीत नक्षल्यांचा सुद्धा समावेश आहे, अशी माहिती मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.सामूहिक विवाह सोहळ्यासाठी ३२ हजार चौरस फुटावर भव्य विवाह मंडप व २० हजार चौरस फूटावर जेवनाचा मंडप उभारण्यात आला आहे. प्रत्येक समाजातील चालीरितीप्रमाणे विवाह करता यावा, यासाठी १० यज्ञकुंड ठेवले जाणार आहेत. कार्यक्रमाची जबाबदारी पार पाडण्यासाठी १४ आयोजन समित्या तयार करण्यात आले आहेत. आयोजकांमार्फत जोडप्यांना पोशाख, नवरीला मंगळसूत्र व संसारोपयोगी साहित्य, आईवडिलांना अहेर दिला जाणार आहे. वधू व वरांकडील प्रत्येकी १५ नातेवाईकांना आमंत्रित करण्यात आले आहे. लग्नसमारंभ आटोपल्यानंतर २१० नवविवाहीत वधू-वरांची जेवणाची पंगत विशेष आकर्षण असणार आहे. सगळे विधी आटोपल्यानंतर वधू-वरांची वाजतगाजत पाठवणी केली जाईल.केवळ लग्न लावून दिल्यानंतर आपली जबाबदारी संपली, अशी भूमिका न घेता या नवदाम्पत्यांचा संसार सुखाचा व्हावा, म्हणून लग्नानंतरही दीड वर्ष या जोडप्यांचे पालकत्व मैत्री परिवार स्वीकारणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष संजय भेंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला प्रा. प्रमोद पेंडके, पोलीस उपअधीक्षक (गृह) सतीश चौगावकर, डॉ. शिवनाथ कुंभारे, साखरकर, सहायक धर्मदाय आयुक्त प्रताप सातव, निरंजन वासेकर, दिलीप ठाकरे, सम्राट वाघ, अनिल तिडके आदी उपस्थित होते.अधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थितीकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पोलीस उपमहानिरीक्षक सीआरपीएफ (अभियान) टी. शेखर राहतील. प्रमुख अतिथी म्हणून पोलीस उपमहानिरीक्षक अंकुश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख उपस्थित राहतील.गडचिरोली शहरात पोलीस विभागाच्या वतीने पहिल्यांदाच १०५ जोडपी विवाहबद्ध होणार आहेत. यापूर्वी संबंधित जोडप्याचा विवाह झाला नाही, याची पोलीस विभागाने खात्री केली आहे, अशी माहिती आयोजकांनी दिली.

टॅग्स :marriageलग्न