कृषी पंप वीजजोडणी व थकबाकीमध्ये सवलतीसंदर्भात शासनाने स्वतंत्र कृषी पंप वीजजोडणी धोरण लागू केले आहे. या अंतर्गत कृषी पंपधारकांना वीज बिलात सवलत देण्याच्या योजनेतून चंद्रपूर परिमंडळात ही याेजना राबविली जात आहे. चंद्रपूर परिमंडळात चंद्रपूर व गडचिरेाली जिल्ह्याचा समावेश आहे. त्यात चंद्रपूर, वरोरा, ब्रम्हपुरी, गडचिराेली व आलापल्ली विभागातील एकंदरीत ३१ हजार ८०७ कृषी पंप ग्राहकांनी २६ कोटी ९५ लाख रुपयांचा भरणा केला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील २२ हजार १२१ कृषी ग्राहकांनी १७ कोटी ५७ लाख रुपये भरले आहेत. या रकमेतून ३३ टक्के म्हणजे ५ कोटी ७९ लाख रुपये कृषी ग्राहकांच्या संबंधित गावाच्या मूलभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार आहेत. तर उर्वरित ३३ टक्के म्हणजे ५ कोटी ७९ लाख हे कृषी ग्राहकांच्या जिल्ह्यातील मूलभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार आहेत.
तसेच गडचिरेाली जिल्ह्यातील कृषी पंपधारकांकडून भरल्या गेलेल्या ८ कोटी ७३ लाख ४२ हजार रुपयांच्या रकमेतून ३३ टक्के म्हणजे २ कोटी ८८ लाख हे कृषी ग्राहकांच्या संबंधित गावाच्या मूलभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार आहे, तर ३३ टक्के म्हणजे २ काेटी ८८ लाख रुपये गडचिरेाली जिल्ह्यातील मूलभूत सुविधांसाठी उपलब्ध होणार आहेत. एकंदरीत ६६ टक्के म्हणजे ५ कोटी ७६ लाख रुपये गाव व जिल्हा विकासासाठी उपलब्ध झाले आहेत. या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे.
बाॅक्स
कॅपासिटरचा वापर करा
कॅपॅसिटरच्या वापरामुळे कृषी पंपांना योग्य दाबाचा वीज पुरवठा मिळताे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याने कॅपॅसिटरचा वापर करावा, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता सुनील देशपांडे यांनी केले आहे. महावितरणच्यावतीने कृषी पंप हाताळताना घेण्यात येणारी खबरदारी, वीजसुरक्षा याबाबत मार्गदर्शन करीत आहेत.