लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यातील १०० अंगणवाड्यांचे 'नंदघर' मध्ये रूपांतर करण्यात येणार असून त्यात ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध असणार आहे. सकाळच्या सत्रात बालकांना शिक्षण व पोषण साहाय्य दिले आईल. दुपारच्या सत्रात महिलांसाठी आरोग्य व सुक्ष्म उद्योजकता जनजागृती कार्यक्रम राबविले जातील. मुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे.
महिला त बालकल्याण विभागाच्यावतीने जिल्हा परिषद त वेदांत ग्रुपच्या अनिल अग्रवाल फाउंडेशन यांच्यात सामंजस्य करार (MoU) झाला आहे. जि.प. सीईओ सुहास गाडे आणि नदघरचे मुख्य कार्यकारी अधिकारी शशी अरोरा याच्या स्वाक्षरीने हा करार करण्यात आला. या करारांतर्गत अंगणवाडचोना आधुनिक सुविधा देऊन त्यांचे 'नंद 'नंदघर' मध्ये रूपांतर केले आईल, या प्रकल्पानुसार 'नंदघर' मध्ये ३ ते ६ वर्षे वयोगटासाठी मूलांना बाल शिक्षण तसेच आरोग्य व पोषण साहाय्य देण्यात येणार आहे. तर दुपारी महिलांसाठी आरोग्य त सुक्ष्म उद्योग विषयक जनजागृती कार्यक्रम घेतले जातील.
३८६७ बालकांना पोषण आहारया १०० अंगणवाद्यांमध्ये एकूण ० ते ६ वर्षांच्या ३ हजार ८६७ चालके व ६०२ गरोदर व स्तनदा मातांना लाभ मिळणार आहे. याचबरोबर ११३४ किशोरी मुलींना दुपारच्या सत्रात उद्योग पूरक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यामुळे दुर्गम भागातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या समस्यांचे निराकरण करण्यास व महिलांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात मदत होणार आहे.
'नंदघर' मध्ये अशा असतील सुविधा
- या उपक्रमांतर्गत अंगणवादवांची रंगरंगोटी, बालमैत्रीय सजावट, ई-लर्निंगसाठी LED टीव्ही/टैबलेट वामह मूलभूत सुविधांचा समावेश आहे. तसेच अंगणवाडी सेविकांसाठी ई-लर्निंग व आरोग्यसेवांसाठी आशा वर्कर्स व ANM चे प्रशिक्षणही दिले जाणार आहे
- जिल्हा परिषद या प्रकल्पासाठी समन्वयक म्हणून काम करणार असून जिल्ह्यातील अंगणवाड्यांची यादी देणे, जिल्हास्तरावर नोडल अधिकारी नियुक्त करणे, ब्रडिंग व देखभाल करणार आहेत.
- अंगणवाज्जांमध्ये पाणी, स्वच्छतागृह, वीजपुरवठा आणि आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, प्रकल्पाची अंमलबजावणी व त्यावरील देखरेख करण्यासाठी संयुक्त कार्यगट स्थापन करण्यात येणार आहे.