शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजीनामा तर द्यावाच लागेल..."; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंचा नवा व्हिडिओ आला समोर
2
“२५ वर्षे विधानसभेत, राजीनामा देण्यासारखे घडले काय?”; माणिकराव कोकाटे विरोधकांवर बरसले
3
"राज्याला भिकारी म्हणून त्यांनी कळस गाठलाय"; कोकाटेंच्या राजीनाम्यासाठी सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांना विनंती
4
'सभागृहाचं कामकाज संपलं होतं, हे विधान धडधडीत खोटं'; रोहित पवारांनी कोकाटेंचे आणखी दोन व्हिडीओ केले पोस्ट
5
'मी बोलेन तेच...'; राज्यसभेतील 'ते' विधान आणि धनखड यांच्या बैठकीला दांडी, राजीनाम्यानंतर नड्डांनी मौन सोडलं
6
सचिनजींना भेदता आलं नव्हतं 'महाभारत'चं चक्रव्यूह, 'कोण होणार करोडपती'मध्ये दिलेलं चुकीचं उत्तर, पाहा व्हिडीओ
7
कुठे नेऊन ठेवलाय...! डोक्याला फेटा, गळ्यात हार अन् ढोलताशांचा गजर...; विधानभवनात 'राडा' करणाऱ्यांचं जंगी स्वागत
8
मुख्यमंत्री नितीश कुमारांना भारताचे उपराष्ट्रपती बनवा; भाजप आमदाराची मागणी
9
"उपराष्ट्रपतींसह अनेक भूमिकांमध्ये त्यांना..."; जगदीप धनखड यांच्या राजीनाम्यावर PM मोदींची प्रतिक्रिया
10
खुनी सोनम रघुवंशीवर लवकरच येणार चित्रपट? बॉलिवूडमधल्या 'या' टॉप अभिनेत्याची बारीक नजर
11
“मला रमी खेळताच येत नाही, दोषी असेन तर नागपूर अधिवेशनात राजीनामा देईन”: माणिकराव कोकाटे
12
फक्त १०० रुपयांत घर तुमचं! भारतीयांसाठी 'या' देशात घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, कशी आहे ऑफर?
13
Virar: 'डिलिव्हरी बॉय'ने लिफ्टमध्येच केली लघवी; आधी दिला म्हणाला नाही, व्हिडीओ दाखवताच...
14
कास्टिंग काऊचची सुरुवात नक्की कशी होते? मराठी अभिनेत्रीने केली इंडस्ट्रीची पोलखोल
15
अखेर 'ते' ब्रिटिश लढाऊ विमान दुरुस्त झाले; केरळहून ब्रिटनच्या दिशेने रवाना
16
आईच्या अपमानाचा बदला! दहा वर्षे घेतला आरोपीचा शोध, समोर येताच केले ठार; सोशल मीडिया पोस्टमुळे सापडले
17
धनखड यांच्यानंतर आता कोण सांभाळणार कामकाज? 19 सप्टेंबरपूर्वी, नव्या उपराष्ट्रपतींची निवड होणं का आवश्यक? जाणून घ्या
18
FASTag ट्रान्सफर करणं झालं सोपं; विना टेन्शन एका बँकेतून दुसर्‍या बँकेत करू शकता शिफ्ट
19
IND vs ENG : इंग्लंडनं खेळली टीम इंडियासारखी 'चाल'; कसोटी क्रिकेटमध्ये असं पहिल्यांदाच घडलं
20
"मी लघवी स्वत:च प्यायलो, त्यांना दिली नाही म्हणून...", ट्रोल करणाऱ्यांना परेश रावल यांची सणसणीत चपराक

बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्यास १० वर्षांचा सश्रम कारावास

By admin | Updated: April 22, 2017 01:16 IST

शेतात तुरीच्या शेंगा तोडत असलेल्या महिलेचा हात पकडून तिच्यावर बळजबरीने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल गडचिरोली : शेतात तुरीच्या शेंगा तोडत असलेल्या महिलेचा हात पकडून तिच्यावर बळजबरीने बलात्काराचा प्रयत्न करणाऱ्या आरोपीस गडचिरोली येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दहा वर्षांचा कारावास ठोठावला आहे. दादाजी झुंगाजी कांबळे (४०) रा. मोहुर्ली ता. चामोर्शी असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. प्राप्त माहितीनुसार, ११ जानेवारी २०१५ रोजी पिडीत महिला आपल्या मोहुर्ली येथील शेतात तुरीच्या शेंगा तोडत असताना आरोपी दादाजी कांबळे याने मागून जावून तिचा हात पकडला. तू मला आवडतेस असे म्हणून त्याने बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. तिचे तोंड दाबून तिला बांदीमध्ये ढकलून दिले. पिडीतेने ओरडण्याचा प्रयत्न केला असता जोराने तोंड दाबून धरले. यामुळे तिला जखमा झाल्या. पिडीतेने चामोर्शी पोलिस ठाणे गाठून आरोपीविरूध्द तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरूध्द कलम ३७६ (१) , ५११ भादंवी अन्वये गुन्हा दाखल केला. आरोपीला याच दिवशी अटक करण्यात आली. गुन्ह्याचा तपास पुर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. न्यायालयात साक्षीदारांचे बयाण नोंदवून सरकारी पक्षाचा युक्तीवाद ग्राह्य धरून आरोपीला शुक्रवार २१ एप्रिल रोजी १० वर्ष सश्रम कारावास व ३ हजार रुपए दंड ठोठावला आहे. सरकारी पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता निलकंठ भांडेकर यांनी काम बघितले. गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक मनोजकुमार नवसरे यांनी केला. पैरवी अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक जयेश खंदरकर यांनी काम बघितले. (स्थानिक प्रतिनिधी)