शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार घरकूल झाले प्रकाशमय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2018 00:36 IST

सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे.

ठळक मुद्देमोफत वीज पुरवठा : एका महिन्यात दिल्या जोडण्या

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सौभाग्य योजनेतून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे ९ हजार ८६९ घरकुलांना वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे ही घरे दिवाळीपूर्वी प्रकाशमय झाले आहेत. विशेष म्हणजे, या घरांना एका महिन्याच्या कालावधीत वीज पुरवठा झाला आहे.जगाच्या विकासात विजेचे महत्त्व अनन्य साधारण आहे. हे जरी मान्य केले तरी गडचिरोली जिल्ह्यातील काही गावे विजेपासून वंचित आहेत. तर गरीब नागरिक वीज पुरवठ्यासाठी पैसे भरून वीज पुरवठा घेऊ शकत नाही. अशा कुटुंबांना वीज पुरवठा करण्यासाठी केंद्र शासनाने सौभाग्य योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत गरीब नागरिकांना वीज विभागाकडून मोफत वीज जोडणी उपलब्ध करून देण्यात आली आहे. या योजनेंतर्गत जिल्हाभरातील ९ हजार ८६९ कुटुंबांना विजेची सेवा उपलब्ध झाली आहे. यात आलापल्ली विभागातील सर्वाधिक ९ हजार ३२० कुटुंब आहेत. तर गडचिरोली विभागातील ५४९ कुटुंबांचा समावेश आहे. शासनाच्या मदतीने महावितरणने गरीब नागरिकांना वीज पुरवठा उपलब्ध करून देत सामाजिक दायित्त्व पार पाडले आहेत.आलापल्ली विभागांतर्गत एटापल्ली, सिरोंचा, भामरागड, अहेरी हे तालुके येतात. या तालुक्यांमध्ये ९० टक्के क्षेत्र जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे वीज लाईन टाकताना फार मोठी अडचण निर्माण होते. या बाबीवर मात करीत महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, अभियंते यांनी दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचविली. आता या कुटुंबांना मोफत वीज पुरवठा दिला जात आहे. विशेष म्हणजे या कुटुंबांना दिवाळीपूर्वीच वीज जोडणी मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद द्विगुणित झाला आहे.काही प्रमाणात साहित्यही मोफतसौभाग्य योजनेत शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या घरांना वीज जोडणीचा लाभ देण्यात येते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना ही वीज जोडणी विनाशुल्क आहे. तर इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रूपये शुल्क आकारण्यात आले आहे. योजनेत वीज पुरवठा प्राप्त झालेल्या ग्राहकांना मासिक वीज बिल भरणे बंधनकारक आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चारर्जिंग पार्इंट, एक एलईडी बल्ब मोफत देण्यात आला आहे. प्रधानमंत्री आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना आदी योजनेंतर्गत बांधलेल्या घरकुलांनाही वीज पुरवठा दिला आहे. 

टॅग्स :electricityवीज