गडचिरोली : निवडणूक निकाल जाहीर झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांत निवडणुकीचा हिशोब सादर न केलेल्या नगर परिषदेच्या आणखी १० उमेदवारांवर तीन वर्ष निवडणूक बंदीची कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे आता कारवाई झालेल्या उमेदवारांची संख्या आता २० झाली आहे. कारवाई झालेल्यांमध्ये गडचिरोली नगर परिषदेच्या उमेदवार शेंडे निर्मला सुधाकर, भांडेकर माधव सदु, ब्राम्हणवाडे ज्योती विनोद, भांडेकर ललीता रामचंद्र, हुसैन नईमा जाकीर, भडके धनराज पंकज, मडावी श्रीराम शालिकराम, भांडेकर पूनम रमेश, करकाडे पुष्पाताई उद्धव व देसाईगंज नगर परिषदेतील उमेदवार पुरी रंजना जगदीश यांचा समावेश आहे. महाराष्ट्र नगर परिषद, नगर पंचायत व औद्योगिक नागरी अधिनियम १९६५ च्या कलम १६ (१) (ड) अनुसार कारवाई करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी यांनी कळविले आहे. (नगर प्रतिनिधी)
आणखी १० न. प. उमेदवारांवर कारवाई
By admin | Updated: February 17, 2017 01:25 IST