शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह १० लाखांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 22:23 IST

तालुक्यातील पोर्ला मार्गे वडधाकडे चारचाकी वाहनाने दारूची तस्करी करीत असताना वाहनासह १० लाख रूपयांची दारू उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्त्वात शनिवारी जप्त करण्यात आली.

ठळक मुद्देपोर्ला-वडधा मार्गावर कारवाई : एसडीपीओंच्या नेतृत्वात धाड

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील पोर्ला मार्गे वडधाकडे चारचाकी वाहनाने दारूची तस्करी करीत असताना वाहनासह १० लाख रूपयांची दारू उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे यांच्या नेतृत्त्वात शनिवारी जप्त करण्यात आली. मयूर राजाराम निमजे (२३) रा. ब्रम्हपुरी असे अटक करण्यात आलेल्या दारू विक्रेत्याचे नाव आहे.गुप्त माहितीच्या आधारे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सागर कवडे हे पोलीस कर्मचाऱ्यांसह पोर्ला-वडधा मार्गावर गस्तीवर होते. दरम्यान एमएच १५ सीएम- २५७५ क्रमांकाचे चारचाकी वाहन येताना दिसले. हात दाखवून सदर वाहनाला त्यांनी थांबविले. सदर वाहन संशयास्पद स्थितीत आढळल्याने वाहनाची चौकशी केली. दरम्यान वाहनचालकाने आपले नाव मयूर राजाराम निमजे रा. ब्रम्हपुरी असे सांगितले. वाहनाची पंचासमक्ष पाहणी केली असता, वाहनात ३ लाख ६० हजार रूपये किमतीची दारू आढळून आली. तसेच ६ लाख ५५ हजार रूपये किमतीचे वाहन जप्त करण्यात आले. वाहन व दारू मिळून एकूण १० लाख १५ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. निमजे याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.