शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
2
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
3
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
4
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
5
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
6
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
7
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
8
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
9
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
10
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
11
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
12
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
13
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
14
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
15
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
16
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली
17
बॉम्ब फोडूनही अमेरिका काही करू शकली नाही! ३७ तास हवेतच होते ६ बी२ बॉम्बर..., इराण म्हणतेय...
18
आतापर्यंत इस्रायली हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा जाणून थक्क व्हाल! खामेनेई सैनिकांकडूनही जोरदार प्रत्युत्तर
19
ट्रम्प यांच्या 'या' निर्णयाने जागतिक अर्थव्यवस्थेला धक्का? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?
20
जगाचे 'लॉजिस्टिक्स' बदलणाऱ्या अवलियाचे निधन! मालवाहतुकीसाठी पहिल्यांदाच केला असा प्रयोग

भामरागड पर्यटनासाठी १० कोटींची गरज

By admin | Updated: November 29, 2015 02:19 IST

जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला असून या पर्यटन विकास आराखड्यात भामरागड ...

पर्यटन विकास आराखडा तयार : शासनाकडे निधीची केली आहे मागणीगडचिरोली : जिल्हा नियोजन विभागाच्या वतीने संपूर्ण जिल्ह्याचा पर्यटन विकास आराखडा तयार केला असून या पर्यटन विकास आराखड्यात भामरागड तालुक्याला पर्यटनदृष्ट्या विकसित करायचे असेल तर १० कोटी ४७ लाख रूपयांची गरज असल्याचे म्हटले आहे. याबाबतचा प्रस्ताव जिल्हा नियोजन अधिकाऱ्यांनी राज्य शासनाकडे सादर केला आहे. या आराखड्याची अंमलबजावणी करण्यासाठी निधीची प्रतीक्षा सुरू आहे. भामरागड हा गडचिरोली जिल्ह्यातील छत्तीसगड राज्याला लागलेला तालुका आहे. सदर तालुका आदिवासीबहुल असून घनदाट जंगलाने व्यापला आहे. काही वर्षांपूर्वी जंगलव्याप्त भाग पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास येऊ शकते. ही बाब अनेकांच्या पचनी न पडणारी होती. मात्र मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठमोठ्या शहरांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना जंगल पर्यटनाचे विशेष आकर्षण असल्याचे दिसून येत आहे. दिवसेंदिवस चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा, गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव बांध यासारख्या जंगलव्याप्त पर्यटनस्थळांवर गर्दी वाढत असल्याचे दिसून येते. यामध्ये भामरागड तालुकाही मागे नाही. याही तालुक्याला मागील दिवाळीच्या सुट्यांमध्ये अनेक पर्यटकांनी भेट दिली आहे. भामरागड तालुक्यातील हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्प जगप्रसिद्ध आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी देशभरातील अनेक नागरिक येतात. हेमलकसा जवळील तीन नद्यांचे संगम येणाऱ्या पर्यटकांचे पारणे फिटते. पुढे जाऊन बिनागुंडा येथील धबधबा आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरू शकते. मात्र बिनागुंडा धबधब्याजवळ जाण्यासाठी अजूनही रस्त्यांची सुविधा उपलब्ध नाही. भामरागड तालुका डोंगरदऱ्या व घनदाट जंगलाने व्यापला आहे. त्यामुळे या तालुक्यात पर्यटकांना आकर्षित करायचे असेल तर रस्त्यांचा विकास होणे आवश्यक आहे. त्रिवेणी संगमावर बोटिंगची व्यवस्था, राहण्यासाठी रेस्ट हॉऊस, बगीचा आदींचा विकास करण्यासाठी जवळपास १० कोटी ४७ लाख रूपयांचा खर्च येऊ शकतो. पर्यटकांसाठी या सर्व सुविधा उपलब्ध झाल्यास भामरागड तालुक्यात पर्यटकांची गर्दी बघायला मिळेल. (नगर प्रतिनिधी)