शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

यंग इंडियाचे पाच शिलेदार!, प्रशिक्षक मातोस यांनी दाखवला विश्वास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 11:40 IST

१७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ह्ययंग इंडियाह्णची मोहीम सोमवारपासून (दि. ९) सुरू होईल. भारताचा पहिला सामना कोलंबियाविरुद्ध आहे.

सचिन कोरडेपणजी : १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत ह्ययंग इंडियाह्णची मोहीम सोमवारपासून (दि. ९) सुरू होईल. भारताचा पहिला सामना कोलंबियाविरुद्ध आहे. हा संघ मजबूत मानला जात आहे. त्यामुळे भारतासाठी सुरुवात सोपी नसेल. असे असले तरी प्रशिक्षक मातोस यांनी आपल्या काही शिलेदारांवर विश्वास दाखवला आहे. भारतीय संघातील पाच खेळाडू मुख्य मानले जात असून त्यांच्यावर बरीच भिस्त असेल.यात अनिकेत जाधव, कोमल थटाल, संजीव स्टॅलीन, कर्णधार अमरजीत सिंग आणि अन्वर अली यांचा समावेश आहे. या खेळाडूंच्या कामगिरीवरील संक्षिप्त नजर...भारतीय संघ: गोलरक्षक - धीरज सिंग, प्रभसुखान गिल, सनी धालिवाल. बचावपटू- बोरीस सिंग, जितेंद्र सिंग, अन्वर अली, हेद्री अंतोनी, नमित देशपांडे. मध्यरक्षक- सुरेश सिंग, निंथिओगांबा मितेई, अमरजीत सिंग कियाम, अभिजीत सरकार, कोमल थटाल, जॅक्सन सिंग, नांगडोम्बा नाओरेम, राहुल कनोली प्रवीण, मोहम्मद शाहजान. आघाडीपटू- राहिम अली, अनिकेत जाधव.अमरजीत सिंग कियाम...प्रशिक्षक मातोस यांनी या खेळाडूतील नेतृत्वगुण हेरले. या गुणांमुळेच त्याला सर्व खेळाडूंनी कर्णधार म्हणून निवडले. खेळाडूंच्या पसंतीनेच कर्णधाराची निवड ही अभिनव कल्पना मातोस यांचीच. सर्वाधिक मतदान मिळवून अमरजीतने जिंकून घेतले. त्याच्यावर इतर खेळाडूंचाही भरवसा आहे. अत्यंत शांत आणि मिडफिल्डवर चपळ असणारा हा खेळाडू प्रतिस्पर्ध्यांसाठी घातक ठरू शकतो. मूळचा मणिपुरी असणारा हा खेळाडू चंदिगड अकादमीतून खेळत राष्ट्रीय स्तरावर पोहचला.अनिकेत जाधव...कोल्हापूरच्या (महाराष्ट्र) या खेळाडूने १६ वर्षांखालील एएफसी चषकात लक्ष वेधले होते. त्या वेळीच त्याने विश्वचषकासाठी आपली ‘सीट’ बुक केली होती. १४ वर्षांचा असतानाच त्याने एफसी बेयर्न म्युनिच युथ चषकात भारताचे प्रतिनिधीत्व केले. हा एक उत्तम स्ट्रायकर. मातोस यांच्या पसंतीचा. ‘फ्रंट लिडिंग अटॅक’ याच्याकडेच असेल. भारतीय फुटबॉलमधील हा उगवता तारा आहे.कोमल थटाल...सिक्कीमसारख्या दुर्गम भागात जन्मलेला हा खेळाडू कष्टाळू. भारतीय संघाचा ‘चीफ प्लेमेकर’ म्हणून याच्याकडे पाहिले जात आहे. ब्राझील आणि उरुग्वे संघाविरुद्ध गोल नोंदवणारा हा एकमेव खेळाडू आहे. १६ वर्षांखालील एएफसी चषकात कोमलची चर्चा अधिक होती. अत्यंत जिद्दी, वेगवान अािण चपळता ही कोमलची खासियत आहे.संजीव स्टॅलीन..संघाचा ‘बॅकबोन’ खेळाडू म्हणून ओळख.संपूर्ण मैदानात खेळण्यास सक्षम. बंगळुरूत जन्मलेल्या या खेळाडूचे पाय मजबूत आहेत. प्रतिस्पर्धी संघाच्या खेळाडूला चकवा देत चेंडू आपल्या ताब्यात घेण्याची कला याला चांगलीच अवगत आहे. त्यामुळे स्ट्रायकर्सला संधी मिळवून देण्यात याचा वाटा अधिक असेल.अन्वर अली...एप्रिल २०१७ मध्ये हा भारतीय संघात सामील झाला. मार्चमध्ये झालेल्या स्पर्धेत राष्ट्रीय संघाला मिनर्वा क्लबने एकमेव गोलने पराभूत केले होते. त्या वेळी मातोस यांची नजर अन्वर अलीवर पडली. माजी प्रशिक्षक निकोल अ?ॅडम यांनीही अन्वरची शिफारस केली होती.

टॅग्स :Sportsक्रीडाNavi Mumbaiनवी मुंबई2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017