शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
2
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
5
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
6
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
7
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
8
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
9
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
12
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
13
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
14
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
15
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
16
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
17
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
18
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
19
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
20
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?

विश्वविजेतेपदाच्या रंगाचा बेरंग, दुकानांची तोडफोड करून केली लूटमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2018 05:49 IST

फ्रान्स संघाने विश्वविजेतपद पटकावल्यानंतर लाखो चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला तर चॅम्प्स एलिसिस एवेन्यूमध्ये डझनभर युवकांनी एका लोकप्रिय स्टोअर्सच्या खिडक्या तोडल्या आणि लुटमार केली.

पॅरिस : फ्रान्स संघाने विश्वविजेतपद पटकावल्यानंतर लाखो चाहत्यांनी रस्त्यावर उतरून जल्लोष केला तर चॅम्प्स एलिसिस एवेन्यूमध्ये डझनभर युवकांनी एका लोकप्रिय स्टोअर्सच्या खिडक्या तोडल्या आणि लुटमार केली. रविवारी स्की मास्क घालून जवळजवळ ३० लोक पब्लिसिस ड्रग्सस्टोअरमध्ये शिरले आणि वाईन व शॅम्पेनच्या बॉटल घेऊन पसार झाले. दरम्यान, यावेळी काहींनी हसत-हसत मोबाईलवर आपला व्हिडीओ तयार केला. काहींनी पोलीस पथकावर बॉटल्स व खुर्च्या फेकल्या. प्रत्युत्तरात पोलिसांनी अश्रुगॅसचा वापर केला.फ्रान्स संघाचा टी-शर्ट घालून डोळ्यात अश्रु असलेला एक व्यक्ती म्हणाला,‘जल्लोष करण्याची ही पद्धत नाही.’ या प्रसिद्ध स्थळावरून लाखो चाहते परतल्यानंतर पोलिसांनी उर्वरित लोकांना हटविण्यासाठी पाण्याचा मारा केला.अधिकाऱ्यांनी सांगितले की, फ्रान्सच्या दक्षिणेतील शहर लियोमध्ये पोलीस व जवळजवळ १०० युवकांमध्ये वाद झाला. स्क्रिनवर सामना बघताना युवक पोलिसांच्या वहानावर चढले. पोलिसांनी युवकांना पिटाळण्यासाठी अश्रुगॅसचा वापर केला, पण त्यांनी पोलिसांवर वस्तू फेकण्यास प्रारंभ केला आणि कचरापेट्यांना आग लावली. त्यानंतर येथे ‘भाग््म भाग’ झाली.पोलीस प्रवक्ता म्हणाला, ‘मार्सिले मेंमेमध्ये १० जणांना अटक करण्यात आली. येथे दंग्यामध्ये दोन सुरक्षा रक्षक जखमी झाले. पूर्वेतील शहर नैंसीच्या फ्रोआर्ड भागात एक तीन वर्षीय मुलगा आणि सहा वर्षांच्या दोन मुली गंभीर जखमी झाल्या. जल्लोष करताना एका मोटरसायकलने त्यांना धडक दिली.अधिकारी म्हणाला, ‘मोटरसायकलस्वार घटनास्थळावरून पसार झाला.’ पोलिसांनी सांगितले की, ‘एनेसीमध्ये ५० वर्षीय व्यक्तीचा मान मोडल्यामुळे मृत्यू झाला. अंतिम सामना संपल्यानंतर विजयाचा जल्लोष करण्यासाठी या व्यक्तीने कमी पाणी असलेल्या कालव्यात उडी घेतली होती.’ उत्तर फ्रान्समधील एक छोटे गाव सेंट फेलिक्समध्ये अंतिम सामना संपल्यानंतर जल्लोष करताना एका व्यक्तीची कार झाडावर आदळली आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.>फ्रान्सच्या दुसºया विश्वविजेतेपदानंतर चाहते रस्त्यावर उतरले. त्यातील अनेकांच्या हातात राष्ट्रध्वज होते आणि धुराचे बॉम्ब जाळत होते. विश्वकप स्पर्धेच्या अंतिम लढतीच्या पार्श्वभूमीवर पॅरिसमध्ये जवळजवळ चार हजार पोलीस व सुरक्षारक्षकांना तैनात करण्यात आले होते आणि चॅम्प्स एलिसिस एवेन्यूच्या जवळ चारचाकी वाहनांचा प्रवेश रोखण्यात आला होता. २०१५ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर फ्रान्समध्ये हाय अलर्ट आहे. गेल्या वर्षी दहशतवादविरोधी कायद्यानुसार पोलिसांना अतिरिक्त अधिकार बहाल करण्यात आले आहेत.>‘फॅ न झोन’वर लक्ष ठेवण्यासाठी जवळजवळ चार हजार पोलीस तैनात होते. येथे सामन्यादरम्यान ९० हजार लोकांनी गर्दी केली होती. त्यानंतर हे चाहते चॅम्प्स एलिसिस व जवळच्या मार्गावर जल्लोषात सहभागी झाले. रात्र झाल्यानंतर एफिल टॉवरवर ‘१९९८-२०१८’ चमकत होते. हे म्हणजे फ्रान्सच्या विश्वविजेतेपदाचे प्रतीक होते. यावेळी ‘आर्क डी ट्रायंफ’ राष्ट्रीय रंगात रंगले होते. यावर राष्ट्रीय प्रतीक आणि विश्वचॅम्पियन संघाचे चेहरेही दाखविण्यात आले होते. ‘प्राऊड टू बी ब्ल्यू’ हे शब्दही लक्ष वेधून घेत होते. चाहत्यांनी यावेळी राष्ट्रीय ध्वज शरीरावर लपटलेला होता आणि विविध प्रकारच्या टोप्या घातलेल्या होत्या.>विश्वचषक स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार मिळणे निश्चित सन्मानाची बाब आहे. मात्र मी विश्वचषक जिंकू इच्छित होतो हे स्पष्ट आहे. आता आम्ही काही दिवस आराम करु. क्रोएशियासाठी उपविजेतेपद देखील खूप मोठे यश असल्याने आम्ही याचही आनंद साजरा करु. आम्ही जी कामगिरी केली, त्याचा आम्हाला गर्व आहे. मात्र अंतिम सामन्यात पराभूत होण्याचे दु:खही आहे. माझ्यामते आम्ही याहून अधिक चांगल्या यशाच्या पात्रतेचे होतो, परंतु आम्ही यात बदल करण्यात यशस्वी ठरलो नाही. आम्ही जे मिळवले आहे, त्याचाच आता अभिमान बाळगू शकतो. आम्ही कधीच हार मान्य केली नाही आणि अखेरपर्यंत आम्ही झुंज दिली.- लुका मॉडरिच, कर्णधार - क्रोएशिया>मी कधीही रेफ्रीच्या कामगिरीवर टीका करत नाही. पण विश्वचषक अंतिम सामन्यात तुम्ही अशाप्रकारे पेनल्टी देऊ शकत नाही. यामुळे कोणत्याही प्रकारे फ्रान्सच्या विजयाचे महत्त्व कमी होत नाही. आम्ही थोडी दुर्दैवीही ठरलो. कदाचित पहिल्या सहा सामन्यांत नशिबाने आमची साथ दिली, पण अंतिम सामन्यात नाही. मला माझ्या खेळाडूंचे अभिनंदन करताना आनंद वाटतो. या स्पर्धेत आम्ही आमचा सर्वोत्तम खेळ केला.- ज्लाटको डॅलिच,प्रशिक्षक - क्रोएशिया>आयफेल टॉवरवर रोषणाई२० वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर देशाने जिंकलेल्या विश्वचषक फुटबॉल जेतेपदाचा आनंद फ्रान्समध्ये रात्रभर सुरु होता. यावेळी जगप्रसिद्ध आयफेल टॉवरवर फ्रान्सच्या ध्वजरंगांची रोषणाई करण्यात आली होती.>जेतेपदाचा जल्लोषविश्वकप फायनलमध्ये क्रोएशियाविरुद्ध फ्रान्सच्या विजयाचा देशात जल्लोष साजरा करण्यात आला. यावेळी पॅरिसमधील चर्चित चॅम्प्स एलिसिस एवेन्यूवर हजारो चाहत्यांनी गर्दी केली होती.फ्रान्सने मॉस्कोत रविवारी झालेल्या विश्वकप फायनलमध्ये क्रोएशियाचा ४-२ ने पराभव करीत २० वर्षांत दुसºयांदा विश्वविजेतेपदाचा मान मिळवला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Franceफ्रान्सCroatiaक्रोएशिया