शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

जेव्हा गतविजेत्यांची सुरुवातच पराभवाने होते....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 23:49 IST

२०१४ च्या विश्वविजेत्या बलाढ्य जर्मनीला रशिया २०१८ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला.

 

-ललित झांबरे२०१४ च्या विश्वविजेत्या बलाढ्य जर्मनीला रशिया २०१८ मधील आपल्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा धक्का बसला.  मेक्सिकोने त्यांना लोझानोच्या ३५ व्या मिनिटाला केलेल्या गोलआधारे १-० अशी मात देत खळबळ उडवून दिली. यासह अर्जेंटीना, फ्रान्स आणि स्पेन या गतविजेत्यांच्या पंक्तीत आता जर्मनीने स्थान मिळवले आहे. या चारही संघांनी विश्वविजेतेपदानंतरच्या पुढच्या विश्वचषकातील पहिलाच सामना गमावला आहे.  यात अर्जेंटीनाचा संघ विशेष ठरतो कारण त्यांनी दोन वेळा विश्वचषक जिंकला (१९७८ व १९८६) आणि त्यानंतर  दोन्ही वेळा पुढच्या विश्वचषकात (१९८२ व १९९०) ते पहिल्याच सामन्यात पराभूत झाले. १३ जून १९८२ ला एर्विन व्हँडेरबर्गच्या दुसºया सत्रातील गोलाआधारे बेल्जियमने गतविजेत्या अर्जेंटिनाला १-० अशी मात दिली होती. पुन्हा अर्जेंटीनावरच अशी वेळ आली ती ८ जून १९९० रोजी. यावेळी त्यांना कॅमेरूनने धक्का दिला. या सामन्यातील एकमेव गोल फ्रँकाईस ओमान बियीक याने हेडरवर केला होता. फ्रान्सने १९९८ मध्ये विश्वचषक जिंकला होता परंतु २००२ च्या विश्वचषकाच्या पहिल्याच सामन्यात त्यांना सेनेगेलने १-० अशी मात दिली. पापा बौबा डियोपच्या गोलाने गतविजेत्यांना पराभव पत्करण्यास भाग पाडले. गेल्या विश्वचषक स्पर्धेवेळी स्पॅनिश संघ विश्वविजेता म्हणून मैदानात उतरला पण १३ जून २०१४ रोजी त्यांच्या पहिल्याच सामन्यात  नेदरलँडस्ने त्यांचा ५-१ असा धुव्वा उडवला होता. या सामन्यात स्पेनसाठी पहिला गोल अलान्सोने २७ व्या मिनिटाला केला होता परंतु त्यानंतर नेदरलँङसाठी व्हॅन पर्सीने ४४ व ७२ व्या मिनिटाला, रॉबेनने ५३ व ८० व्या मिनिटाला आणि स्टीफन डी वीज याने ६४ व्या मिनिटाला गोल करत गतविजेत्यांना लाजिरवाणा पराभव स्विकारायला लावला होता.त्यानंतर आता जर्मनीला मेक्सिकोने धक्का दिला आहे. योगायोग म्हणजे जर्मनीने आजच्या या पराभवाच्या तारखेलाच म्हणजे १७ जून रोजी १९९४ च्या विश्वचषकात मात्र गतविजेते म्हणून विजयी सुरूवात केली होती. त्यावेळी त्यांनी बोलिव्हियावर १-० असा विजय मिळवला होता. यावेळी मात्र विजय तर सोडा, पण ते पराभवसुद्धा टाळू शकले नाहीत. विश्वचषक स्पर्धेच्या आपल्या पहिल्याच सामन्यात जर्मनीचा १९८२ नंतर हा पहिलाच पराभव आहे आणि १९७८ नंतर प्रथमच ते आपल्या सलामीच्या विश्वचषक सामन्यात एकही गोल करू शकलेले नाहीत. विश्वचषकात पहिल्याच सामन्यात पराभूत गतविजेते१९८२   अर्जेंटिना पराभूत वि. बेल्जियम    ०-११९९०   अर्जेंटिना पराभूत वि. कॅमेरून       ०-१२००२   फ्रान्स पराभूत वि. सेनेगेल           ०-१२०१४   स्पेन पराभूत वि. नेदरलँडस्         १-५२०१८    जर्मनी पराभूत वि. मेक्सिको       ०-१

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल