शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक : आॅनलाईन तिकीट विक्रीकडे चाहत्यांची पाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2017 21:14 IST

आॅनलाईन तिकीट विक्रीला अत्यल्प प्रतिसाद लाभत असल्याने येथे मैदानावर ‘बॉक्स आॅफीस’ द्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे.

पणजी, दि. 9 - भारतात पहिल्यांदाच होणा-या १७ वर्षांखालील विश्वचषक स्पर्धेतील गोव्यातील सामन्यांच्या आॅनलाईन तिकीट विक्रीला अत्यल्प प्रतिसाद लाभत असल्याने येथे मैदानावर ‘बॉक्स आॅफीस’ द्वारे तिकीट विक्री करण्यात येत आहे. पण त्यालाही पाहिजे तसा प्रतिसाद मिळालेला नाही. दोन दिवसांत ५५० तिकिटांची विक्री झाली असून ही टक्केवारी एकूण तिकिटांच्या १० टक्के अशी आहे.गोव्यातील पहिला सामना ७ आक्टोबर रोजी जर्मनी व कोस्टारिका यांच्यात होईल.

त्यानंतर १०, १३, १७ आक्टोबर रोजी सामने होतील. माहितीनुसार, सर्व सामन्यांची एकूण ६० हजारपर्यंत तिकिटे आहेत. यापैकी ३० ते ४० टक्क्यांची विक्री आॅनलाइन पध्दतीने होणार आहे. आॅनलाइन तिकीट विक्रीस प्रतिसाद न मिळाल्याने खिडकी पद्धतीने तिकीट विक्री सुरू करण्यात आली. तिकीट विक्री वाढावी म्हणून ५ आॅक्टोबरपर्यंत खरेदी करणा-याला २५ टक्के सूट देण्याचा उपक्रमही राबविण्यत येत आहे. देशात इतर ठिकाणी आॅनलाईन तिकीट विक्रीला चांगला प्रतिसाद मिळाला. गोव्यात मात्र पाहिजे तसे यश मिळाले नाही.अल्प प्रतिसादामुळे चिंता सकाळी १० वाजता तिकीट विक्रीला सुरुवात केली जाते.

शुक्रवारी सुद्धा मोजक्याच फुटबॉलप्रेमींच्या रांगा होत्या. दक्षिण व उत्तर स्टँडसाठी १५० रुपये व पूर्व स्टँडसाठी ३०० रुपये असे तिकिटाचे दर आहेत. दक्षिण गोव्यातील सासष्टी तालुक्यात फुटबॉलचे शौकीन जास्त प्रमाणात असले तरी आजच्या दिवशी काणकोण व सांगे तालुक्यातील फुटबॉलप्रेमींनी तिकिटे खरेदी करण्यासाठी उपस्थिती लावली होती. या वेळी सांगे येथून आलेले सतीश वेळीप म्हणाले की, वरिष्ठ संघांच्या खेळाडूंचा सामना पाहण्याची संधी लाभणार की नाही याची शाश्वती नाही. मात्र, युवा खेळाडूंचे सामने पाहण्याची संधी मिळत आहे. तिकीट मिळवण्यासाठी मात्र कोणताही त्रास झाला नाही. सहज उपलब्ध होत आहेत.