शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

‘भारतीय फुटबॉल’चा दणदणीत विजय; छेत्रीचे पुन्हा वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 23:40 IST

भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सामना पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविण्यास केलेल्या आवाहनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद देत सोमवारी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी मोठी गर्दी केली.

मुंबई : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने सामना पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थिती दर्शविण्यास केलेल्या आवाहनाला भारतीयांनी मोठा प्रतिसाद देत सोमवारी झालेल्या केनियाविरुद्धच्या सामन्यासाठी मोठी गर्दी केली. यावेळी भारतीय संघाने चाहत्यांच्या अपेक्षाही पूर्ण करताना केनियाचा ३-० असा धुव्वा उडवला.अंधेरी येथील ‘मुंबई फुटबॉल अरेना’ स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यापूर्वी छेत्रीने प्रेक्षकांना फुटबॉल सामन्याकडे वळविण्यासाठी एक व्हिडिओ प्रसारित केला होता. यामध्ये त्याने, ‘तुम्ही आम्हाला एकवेळ शिव्या घाला, आमच्यावर टीका करा, पण आमचा खेळ पाहण्यास स्टेडियममध्ये उपस्थित रहा.’ असे आवाहन केले होते. सुनीलच्या या आवाहनाला देशभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आणि सामन्याची सर्व तिकिटेही विकली गेली.त्याचबरोबर केनियाविरुद्धचा सामना सुनीलच्या कारकिर्दीतील शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना होता. विशेष म्हणजे भारताकडून शंभर सामने खेळण्याचा मान मिळवणारा तो केवळ दुसराच फुटबॉलपटू ठरला. याआधी केवळ बायचुंग भुतिया यानेच शंभरहून अधिक सामने खेळले आहेत. भुतियाने १०४ सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. या सामन्यासाठी भुतियासह आय. एम. विजयन हे भारतीय दिग्गज खेळाडूही उपस्थित होते आणि त्यांनी सुनीलचा सन्मानही केला. तसेच, यावेळी संघातील सहकारी आणि सुनीलची पत्नी यांनी मैदानावर त्याला ‘गार्ड आॅफ आॅर्नर’ही दिला.केनियाचा उडाला धुव्वा...आपल्या शंभराव्या आंतरराष्ट्रीय सामन्यात दोन गोल नोंदवत कर्णधार सुनील छेत्रीने केनियाविरुद्ध भारताचा ३-० असा दणदणीत विजय नोंदवला. यासह यजमान भारताने इंटरकॉन्टीनेंटल चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आपली जागा जवळपास निश्चित केली आहे. सुनीलशिवाय जेजे लालपेखलुआ याने गोल करत भारताच्या विजयात योगदान दिले.सुनील छेत्रीने चाहत्यांना केलेले आवाहन लक्षवेधी आणि धक्कादायक ठरले. एक कर्णधार जेव्हा आपल्या संघाचा सामना पाहण्यास येण्याचे आवाहन करतो, तेव्हा नक्कीचे ते अनपेक्षित ठरते. शिवाय ४ जूनचा सामना सुनीलचा शंभरावा आंतरराष्ट्रीय सामना होता. फुटबॉल जगातील सर्वाधिक लोकप्रिय खेळ आहे. पूर्वी भारतात तीन खेळ एकाच बरोबरीने होते ते म्हणजे हॉकी, फुटबॉल आणि क्रिकेट. पण आज क्रिकेट जबरदस्त उंचीवर असून त्यातुलनेत इतर खेळ खूप मागे आहेत. त्यामुळे सुनीलने एक मोठी विनंती केली आहे आणि याला पाठिंबाही दिला पाहिजे. सचिन तेंडुलकर, विराट कोहली यांनीही सुनीलच्या विनंतीला पाठिंबा देत भारतीयांना आवाहन केले. खेळाडू हे एका कलाकार प्रमाणे असतात आणि कलाकारापुढे प्रेक्षकच नसतील, तर कसे वाटेल? अशीच स्थिती सुनीलसाठी आहे. त्यामुळे जर का भारतात क्रीडा संस्कृती तयार करायची असेल, तर प्रत्येक खेळाला पाठिंबा दिला गेला पाहिजे.- अयाझ मेमन, लोकमत संपादकीय सल्लागारमी व्हिडिओद्वारे केलेल्या आवाहनाचा इतका मोठा परिणाम होईल याची अपेक्षाही केली नव्हती. जेव्हा तुम्ही राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करत असता, तेव्हा तुम्हाला प्रेक्षकांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीची अपेक्षा असते.’ - सुनील छेत्री

टॅग्स :Footballफुटबॉल