शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

दुसरी उपांत्य लढत : इंग्लंडच्या मार्गात क्रोएशियाचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 04:47 IST

चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना चकित करणारा इंग्लंड संघ २८ वर्षांनंतर फिफा विश्वकप उपांत्य फेरीत खेळेल, त्यावेळी त्यांना भावनांवर नियंत्रण राखत ‘जायंट किलर’ क्रोएशियाचे आव्हान मोडून काढावे लागेल.

रेपिनो : चमकदार कामगिरीच्या जोरावर सर्वांना चकित करणारा इंग्लंड संघ २८ वर्षांनंतर फिफा विश्वकप उपांत्य फेरीत खेळेल, त्यावेळी त्यांना भावनांवर नियंत्रण राखत ‘जायंट किलर’ क्रोएशियाचे आव्हान मोडून काढावे लागेल.रशियामध्ये आपल्या संघाची कामगिरी बघताना इंग्लंडमध्ये जल्लोष सुरू आहे. प्रशिक्षक साऊथगेटच्या संघाने देशवासीयांच्या हृदयात स्थान मिळवले आहे, पण प्रशिक्षकांनी खेळाडूंना आपले पाय जमिनीवरच ठेवण्याची ताकीद दिली आहे. इंग्लंड यापूर्वी फिफा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरीत १९६६ आणि १९९० मध्ये खेळला होता आणि एकमेव विश्वविजेतेपद १९६६ मध्ये पटकावले होते. मिडफिल्डर डेले अली म्हणाला,‘आम्ही येथे आपल्या तयारीत व्यस्त आहोत. सोशल मीडिया किंवा इंटरनेट बघितल्यानंतर ही मोठी उपलब्धी असल्याची कल्पना येते. आमचे लक्ष उपांत्य फेरीच्या लढतीवर केंद्रित झाले असून त्यासाठी यापूर्वीची कामगिरी विसरावी लागेल.’इंग्लंडने स्वीडनचा २-० ने पराभव करीत अंतिम चारमध्ये स्थान मिळवले. त्यात पहिला गोल अलीने नोंदवला होता. आता त्यांची लढत क्रोएशिया संघासोबत आहे. क्रोएशियाने जेतेपदाचा प्रबळ दावेदार अर्जेंटिना संघाचा साखळी फेरीत पराभव केला होता. क्रोएशिया संघात रियाल माद्रिदचा लुका मोडरिच व बार्सिलोनाचा इव्हान रेकिटिच यांच्यासारखे खेळाडू आहेत.अली म्हणाला, ‘संघाला सुरुवातीपासून चांगल्या कामगिरीवर विश्वास होता. आमच्या संघात प्रतिभावान खेळाडू आहेत. काही दिग्गज खेळाडू व शानदार व्यवस्थापक आहे.’ दुसऱ्या बाजूचा विचार करता क्रोएशिया संघ या महत्त्वाच्या लढतीपूर्वी वादाच्या भोवºयात सापडला आहे. रशियाविरुद्ध पेनल्टी शूटआऊटनंतर माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू ओगजेन वुकोजेविचने युक्रेनला पाठिंबा देणारी व्हिडीओ क्लिप पोस्ट केली आहे. त्यानंतर त्याला पथकातून बाहेर करीत दंड ठोठावण्यात आला आहे. फिफाच्या नियमांनुसार राजकीय वक्तव्यावर बंदी आहे.वादानंतरही क्रोएशियाने गेल्या २० वर्षांमधील विश्वकप स्पर्धेत आपली सर्वोत्तम कामगिरी केली आहे. डालिच म्हणाले,‘आम्ही इंग्लंडच्या विश्वकप जिंकण्याच्या स्वप्नांवर पाणी फेरू, असा आम्हाला विश्वास आहे.’ (वृत्तसंस्था)क्रोएशियाची भिस्त फॉर्मात असलेल्या मॉडरिचवरविश्वकप स्पर्धेत क्रोएशियाला मिळालेल्या यशाचा सूत्रधार कर्णधार लुका मॉडरिचवर बुधवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या जाणाºया उपांत्य लढतीत लय कायम राखत संघाला जेतेपदाच्या आणखी एक पाऊल जवळ नेण्याची जबाबदारी राहणार आहे.क्रोएशियाला आतापर्यंत मिळालेल्या पाच विजयांपैकी तीनमध्ये ‘मॅन आॅफ द मॅच’ पुरस्काराचा मानकरी ठरलेल्या मॉडरिचवर अपेक्षांचे ओझे आहे. अर्जेंटिनाविरुद्ध साखळीफेरीत मिळवलेल्या विजयात दोन गोल नोंदवणाºया मॉडरिचने डेन्मार्क व रशियाविरुद्ध शूटआऊटमध्येही गोल नोंदवले होते.स्ट्रायकर मारियो मेंडजुकिच म्हणाला,‘मी लुकाला फार पूर्वीपासून ओळखतो. आम्ही क्लबमध्येही एकत्र खेळलो आहोत. तो या प्रेमाचा हकदार आहे. त्याने बरीच मेहनत घेतली असून तो सर्वोत्तम खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरावा, असे मला वाटते.’ ४० लाख लोकसंख्या असलेल्या देशासाठी फिफा विश्वकप स्पर्धेत उपांत्य फेरी गाठणे मोठी उपलब्धी आहे.मॉडरिच भुतकाळातील कडव्या आठवणी विसरण्यासाठी फुटबॉलच्या या महासंग्रामात सहभागी झाला. त्याला यूरो २००८ क्वार्टर फायनलमध्ये तुर्कीविरुद्ध शूटआऊटमध्ये पेनल्टीवर गोल नोंदवता आला नव्हता. मॉडरिच म्हणाला,‘आम्ही भुतकाळातील कटूस्मृती विसरण्यास प्रयत्नशील असून सर्व ऋण फेडत आहोत.’

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Englandइंग्लंडCroatiaक्रोएशिया