शहरं
Join us  
Trending Stories
1
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
2
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
3
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
4
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
5
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
6
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
7
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
8
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
9
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
10
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
11
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
12
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!
13
गृहकर्जावरील व्याज अनुदान; सविस्तर जाणून घ्या, मोदी सरकारची ही खास योजना; पूर्ण होईल घर घेण्याचं स्वप्न!
14
पहिला श्रावणी रविवार: वैभवप्राप्तीसाठी आदित्य राणूबाई व्रत; वाचा व्रतविधी आणि द्या खिरीचा नैवेद्य!
15
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
16
Shravan Somvar 2025: महादेवाला वाहिलेले बेलाचे पान टाकू नका, तेच करेल धनवृद्धी!
17
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
18
ओठ फुटलेत, कोरडे झालेत... ओठांना मॉइश्चरायझ करण्यासाठी लिप बाम की ऑइल काय आहे बेस्ट?
19
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
20
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता

...आता पुढचा मुक्काम कतार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 04:45 IST

विश्वचषक २०१८ची उपांत्य फेरी पूर्ण होते न होते, तोच सोशल मीडिया ते अन्य माध्यमांमध्ये पुढच्या आवृत्तीची चर्चा-बातम्यांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्या स्पर्धेचे जाहिरात्मक व्हिडीओ आता फिरू लागले आहेत.

- रणजीत दळवीविश्वचषक २०१८ची उपांत्य फेरी पूर्ण होते न होते, तोच सोशल मीडिया ते अन्य माध्यमांमध्ये पुढच्या आवृत्तीची चर्चा-बातम्यांना सुरुवात झाली आहे. सोशल मीडियावर त्या स्पर्धेचे जाहिरात्मक व्हिडीओ आता फिरू लागले आहेत. कतारने २००२च्या आशियाई खेळानंतर प्रथमच अरब जगतामध्ये एवढा विश्व क्रीडा उत्सव होऊ घातला आहे आणि त्याकडे करोडो क्रीडाप्रेमी उत्सुकतेने पाहात आहेत. आशियाचा विचार केला, तर जपान-कोरियाने २००२ सालीच फुटबॉलचा विश्वचषक आयोजिला होता. कतारमधील स्पर्धा ही ३२ संघांची होईल. त्यानंतरची अमेरिका-कॅनडा-मेक्सिको यांच्या यजमानपदाखालील स्पर्धेत ही संख्या दीडपट असेल.कतारला ही स्पर्धा बहाल केल्यानंतर प्रचंड वाद झाला आणि आरोपांचे स्वरूपही गंभीर होते, शिवाय अरब जगतातील काही देशांच्या एका गटाने तर ही स्पर्धा उलथवून टाकण्याचा चंग बांधला होता. त्यामागे राजकीय हेतू होता व क्षेत्रीय आकांक्षाही होत्या. जे लाचखोरीचे आरोप झाले, ते मात्र फिफाचे अध्यक्ष सेप ब्लॅटर यांना चिकटले व त्यांना राजीनामा देण्याबरोबरच चौकशीच्या ससेमिऱ्याला तोंड द्यावे लागले.विश्वचषकासाठी स्टेडियम व विकासकामावरील मजुरांचे अपघाती मृत्यू, त्यांचे मानवाधिकारांचे उल्लंघन यावरही वादंग उफाळला. स्पर्धा नेहमी जून-जुलैमध्ये होत असतात. कतारमध्ये आॅक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत का, असाही प्रश्न उपस्थित केला गेला. तेथले अतिउष्ण हवामानाचा प्रश्न स्टेडियममधील तापमान नियंत्रित करण्याची व्यवस्था असल्याने सुटला. सर्व कटकटी-अडचणी यावर मात करत कतारमध्ये स्पर्धा नियोजितपणे पार पडेल हे या घडिला स्पष्ट होते आहे. कतारमध्ये ही स्पर्धा घेण्याने आशियाई फुटबॉलला कितपत लाभ व्हावा? मुख्य म्हणजे अरब जगतामध्ये खेळाचे वेड दिसेल. शिवाय येथे बक्कळ पैसाही आहे. मात्र, खेळाचा दर्जा तसा उच्च नाही. सौदी अरेबियाच्या रशियातील प्रदर्शनाने त्याचा अंदाज आपल्याला आला. या क्षेत्रामध्ये एक गोष्ट नक्की होईल. विश्वदर्जाच्या स्टेडियम्सची निर्मिती! त्यांचा उपयोग जगातील अव्वल संघांना खेळण्यासाठी निमंत्रित करण्यास होईल. आजूबाजूंच्या देशांमध्ये आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि किफायतशीर ‘नॅशनल लीग’चे आयोजनही शक्य व्हावे. याचा जपानला किती फायदा झाला हे सर्वांनीच नाही का अनुभवले?आशियाई संघांना अजून बरीच मजल मारायची असली, तरी कोठेतरी सुरुवात करणे गरजेचे आहे. जपान, कोरिया आणि इराणचा काही अंशी अपवाद वगळता, आशियाई संघ आफ्रिकेच्या जवळपासही येते नाहीत. आफ्रिकेने अधूनमधून आपले शक्तिप्रदर्शन केले असले, तरी लॅटिन अमेरिका आणि युरोपच्या मक्तेदारीला आव्हान देणे जमले नाही. अरब जगाचे ‘पेट्रो-डॉलर्स’ येथे फुटबॉलच्या भरभराटीला केवढा तरी मोठा हातभार लावू शकतात. ज्या प्रकारे इंग्लिश प्रीमिअर लीगमधील आर्सेनल एफसीच्या मागे आखातातील एक विमान कंपनी खंबीरपणे उभी राहिली. त्याचप्रकारे, अन्य कंपन्या आणि येथल्या राजघराण्यांच्या मालकीच्या उद्योगधद्यांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा द्यावयास हवा. पैसे येतील, पायाभूत सुविधाही निर्माण होतील, हे स्पष्ट असले, तरी येथले क्रीडापटू कष्ट घेणारे नाहीत. हा कटू अनुभव आखातामध्ये हॉकी प्रशिक्षण देण्यासाठी गेलेल्या काही माजी भारतीय आॅलिम्पियन आणि आंतरराष्ट्रीय खेळाडूंना आला. शिस्तीचा अभाव हीदेखील गंभीर समस्या तेथे आहे.

टॅग्स :FootballफुटबॉलFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८