शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मेस्सी, रेपीनो ठरले सर्वोत्कृष्ट फुटबॉलपटू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2019 07:12 IST

अर्जेंटिना आणि एफसी बार्सिलोना संघांचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सी याने सोमवारी फिफाचा वर्षांचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला.

मिलान : अर्जेंटिना आणि एफसी बार्सिलोना संघांचा स्टार स्ट्रायकर लियोनेल मेस्सी याने सोमवारी फिफाचा वर्षांचा सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्याचवेळी, महिला गटात अमेरिकेची स्टार खेळाडू मेगान रेपीनो हिला देण्यात आला. विशेष म्हणजे कारकिर्दीत सर्वाधिक सहाव्यांदा मेस्सीने हा प्रतिष्ठेचा पुरस्कार पटकावला असून अशी कामगिरी करणारा तो एकमेव फुटबॉल ठरला आहे.मेस्सीला हा पुरस्कार मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले. त्याने या पुरस्काराच्या शर्यतीत व्हर्जिल वॉन डिक याला मागे टाकले. वॉन डिक याला मागच्या महिन्यात यूएफचा सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले होते. वॉन डिक याने मागच्या मोसमात लिव्हरपूल चॅम्पियन्स लीग जिंकून देण्यात मोलाची भूमिका बजावली होती.युवेंट्सचा आक्रमक खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डो हा देखील या पुरस्काराच्या शर्यतीत होता, पण तो सोहळ्यात दिसलाच नाही. मेस्सी आणि वॉन डिक हे आता प्रतिष्ठेच्या बेलोन डियोर पुरस्कारासाठी आव्हान सादर करतील. ही घोषणा डिसेंबरमध्ये होईल.महिलांमध्ये अमेरिकेची रेपीनो हिने विश्वचषक विजेत्या संघातील सहकारी खेळाडू अ‍ॅलेक्स मोर्गन आणि इंग्लंडची लुसी ब्रोंझ यांना मागे टाकत सर्वोत्तम फुटबॉलपटूचा पुरस्कार जिंकला. रेपीनो हिला विश्वचषकात सर्वाधिक गोल नोंदवल्याबद्दल गोल्डन बूट तसेच सर्वोत्कृष्ट खेळाडूचा गोल्डन बॉल पुरस्कार देण्यात आला होता. लिव्हरपूलचे मॅनेजर जलर्गेन क्लोप यांना सर्वोत्कृष्ट पुरुष प्रशिक्षक आणि अमेरिकेच्या झिल एलिस यांना सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षक म्हणून सन्मानित करण्यात आले. (वृत्तसंस्था)बार्सिलोनाच्या यशात मोलाचा वाटामेस्सीने विक्रमी सहाव्यांदा हा पुरस्कार पटकावला. गत मोसमात बार्सिलोनाला ला लीगा जेतेपद मिळवून देण्यात व संघाला चॅम्पियन्स लीगच्या उपांत्य फेरीत नेण्यात मेस्सीने निर्णायक कामगिरी केली होती. मेस्सीने २००९, २०१०, २०११, २०१२ व २०१५ अशी ५ वर्षे या पुरस्कारावर कब्जा केला होता. रोनाल्डोने २००८, २०१३, २०१४, २०१६ व २०१७ साली हा पुरस्कार जिंकला आहे.

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सी