शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र झाला फुटबॉलमय, - देवेंद्र फडणवीस  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2017 03:52 IST

भारतात आयोजित होणाºया फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र फुटबॉलमय झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.

मुंबई : भारतात आयोजित होणा-या फिफा १७ वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. यानिमित्ताने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र मिशन वन मिलियन उपक्रमाला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र फुटबॉलमय झाले आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी मुंबईतील बॉम्बे जिमखाना येथे महाराष्ट्र मिशन वन मिलियन अभियानाचे उद्घाटन झाले. यावेळी, फडणवीस यांच्यासह क्रीडामंत्री विनोद तावडे यांनी मुंबईचे डबेवाले यांच्यासह फुटबॉल किक करुन या अभियानाला सुरुवात केली. त्याचवेळी, दृष्टीहीन विद्यार्थ्यांसह मुंबईतील विविध शालेय विद्यार्थ्यांनीही यावेळी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. तसेच यावेळी राजकिय पत्रकार विरुध्द क्रीडा पत्रकार असा विशेष फुटबॉल सामनाही खेळविण्यात आला.दरम्यान, या मिशन वन मिलियन अभियानाचे उद्घाटन झाल्यानंतर राज्यभरात दिवसभर लाखो विद्यार्थ्यांनी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटला. ‘सायंकाळी ५ वाजेपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एकूण २५ लाख ६२ हजार ३५३ विद्यार्थ्यांनी फुटबॉलचा आनंद लुटला. या अभियनामध्ये आम्ही एक मिलियनचे लक्ष्य ठेवले होते, परंतु हा आकडा २.५ मिलियनपर्यंत पोहचवण्याची कामगिरी विद्यार्थ्यांनी केली, अशी माहिती क्रीडामंत्री तावडे यांनी दिली.‘भारतात पहिल्यांदाच फिफा स्पर्धेचे आयोजन होत असून फुटबॉलकडे अधिक युवा वर्गाला आकर्षिक करण्यासाठी राज्यभरात १० लाख विद्यार्थ्यांना फुटबॉल खेळण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. या अभियानाचा मुंबईतून सुरुवात झाली असून राज्यभरात शालेय विद्यार्थी फुटबॉलचाआनंद लुटतील. या अभियानामुळे संपुर्ण महाराष्ट्र फुटबॉलमय झाला आहे,’ असे फडणवीस यांनी यावेळी म्हटले.

टॅग्स :Sportsक्रीडाMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस