शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
3
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
4
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
5
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
6
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
7
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
8
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
9
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
10
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
11
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
12
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
13
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
14
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
15
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
16
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
17
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
18
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
19
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे

फक्त इच्छाशक्ती हवी! मेस्सी आज फुटबॉल चॅम्पियन बनलाच नसता जर बालपणी 'या' गंभीर आजाराला हरवलं नसतं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 15:23 IST

अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं नाव आज प्रत्येकाच्या ओठी आहे. मेस्सीच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही.

अर्जेंटिनाच्या स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीचं नाव आज प्रत्येकाच्या ओठी आहे. मेस्सीच्या लोकप्रियतेबाबत काही वेगळं सांगण्याची गरज नाही. वर्ल्ड नंबर वन खेळाडू म्हणून मेस्सी ओळखला जात असला तरी त्याचा आजवरचा प्रवास काही सोपा नव्हता. प्रत्येक यशस्वी खेळाडूमागे एक प्रचंड मोठी मेहनत आणि अडचणींचा सामना केलेला असतो. मेस्सी देखील याला अपवाद नाही. मेस्सीच्या बाबतीत एक गोष्ट खूप कमी जणांना माहित आहे ती म्हणजे त्यानं बालपणी एका गंभीर आजारावर मात केली आहे. त्या आजाराला जर मेस्सीनं हरवलं नसतं तर आज तो चॅम्पियन फुटबॉलपटू नसता. 

वयाच्या ११ व्या वर्षी मेस्सीला त्याच्या आजाराबाबत समजलं. या आजाराला ग्रोथ हार्मोन डेफिशिएन्सी असं म्हटलं जातं. या आजारामध्ये व्यक्तीची शाररीक वाढ खुंटते. म्हणजे हा आजार उंचीशी निगडीत आहे. त्यावेळी आपल्या आजारावर उपचार करण्यासाठी देखील मेस्सीकडे पैसे नव्हते. मेस्सीचे वडील एका कारखान्यात काम करत होते तर आई क्लिनरचं काम करायची. 

गंभीर आजारावर मात करुन मेस्सी बनला चॅम्पियनमेस्सीची शाररीक वाढ झालीच नसती तर विचार करा की तो फुटबॉल खेळू शकला असता का? आजाराची कल्पना मिळाल्यानंतर पुढची ३ वर्ष तर सामान्य होती. पण २००० साली मेस्सीच्या वडिलांना बार्सिलोना क्लबच्या टॅलंट हंटची माहिती मिळाली. उपचारासाठी आशेचा किरण वडिलांना दिसत होता. त्यामुळे मेस्सीचे वडील थेट स्पेनला पोहोचले. त्यांनी थेट बार्सिलोनाच्या क्लबच्या डायरेक्टसोबत चर्चा केली. मेस्सीच्या आजाराबाबत माहिती दिली. स्पेनला येऊन राहण्याच्या अटीवर बार्सिलोना क्लबनं मेस्सीला आपल्या ताफ्यात सामील केलं. यानंतर मेस्सीच्या आजारावर उपचार देखील झाले आणि फुटबॉलच्या जगताला सुपरस्टार खेळाडू मिळाला. 

FIFA WC 2022 मध्ये मेस्सीची जादूफूटबॉल म्हटलं की मेस्सीचं नाव सर्वात आधी का घेतलं जातं याचं ताजं उदाहरण म्हणजे सध्याचा कतारमध्ये सुरू असलेला फिफा वर्ल्डकप आहे. मेस्सीनं आतापर्यंत कतार वर्ल्डकपमध्ये ६ सामने खेळले आहेत आणि ५ गोल नावावर आहेत. ३ गोल असिस्ट केले आहेत. वर्ल्डकपमध्ये अर्जेटिंनासाठी सर्वाधिक गोल करणाऱ्यांमध्ये मेस्सीचं नाव अव्वल स्थानी पोहोचलं आहे. 

६ पैकी ४ सामन्यात प्लेअर ऑफ द मॅचफिफा वर्ल्डकप २०२२ मध्ये मेस्सीनं खेळलेल्या ६ सामन्यांपैकी ४ सामन्यांमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा पुरस्कार मिळाला आहे. यातूनच मेस्सीच्या जादूची ताकद लक्षात येते. आता मेस्सीची हिच किमया फायनलमध्ये दिसणार का हे पाहणं महत्वाचं असणार आहे. मेस्सी आपल्या करिअरमधील पहिला आणि अर्जेंटिनासाठी तिसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकणार का याची उत्सुकता सर्वांना आहे. 

टॅग्स :Lionel Messiलिओनेल मेस्सीFifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२