शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
2
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
3
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
4
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
5
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
6
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?
7
सुटकेचा थरार! ओलीस ठेवलेल्या मुलांना सोडवण्यासाठी पोलिसांचा गोळीबार; आरोपी रोहित आर्यचा मृत्यू
8
"माजी मंत्री दीपक केसरकर यांनी पवईतील किडनॅपरबाबत दिली अशी माहिती, म्हणाले, मी स्वत:…’’  
9
IND vs AUS : ऑस्ट्रेलिया ऑलआउट! पण फायनलसाठी टीम इंडियासमोर सेट केलं ३३९ धावांचं टार्गेट
10
Kawasaki: कावासाकी व्हर्सिस-एक्स ३०० भारतात लॉन्च; केटीएम, रॉयल एनफील्डच्या 'या' बाईकशी स्पर्धा!
11
मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री
12
UFO संशोधन की आणखी काही, अमेरिकेच्या हवाई दलाच्या तळावर तीन संशोधकांचा मृत्यू , कारण गूढच राहिले
13
मंदिरांच्या भिंतीवर आय लव्ह मोहम्मद लिहिणारे हिंदू तरुण, पोलिसांनी ठोकल्या बेड्या; नावे आली समोर
14
IPL 2026: रोहित शर्मा KKRच्या वाटेवर? Mumbai Indiansची खास पोस्ट चर्चेत, नेमकं काय घडतंय?
15
"...पेक्षाही अधिक धाडस त्या महिलेत होतं"; इंदिरा गांधींचा उल्लेख करत राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर हल्लाबोल
16
Crime: पतीच्या मृत्युनंतर पुन्हा पडली प्रेमात; ४० लाखांच्या विम्यासाठी एकुलत्या एक मुलाला संपवलं!
17
Phoebe Litchfield Fastest Century : फीबीचा 'ट्रॅविस हेड पॅटर्न'; विक्रमी शतकानंतर अतरंगी फटका मारताना फसली!
18
बिहारमध्ये प्रचारादरम्यान वाद, गोळीबारात प्रशांत किशोर यांच्या पक्षाच्या नेत्याचा मृत्यू  
19
नगराध्यक्ष निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पहिला उमेदवार घोषित, दोन नावे होती चर्चेत 
20
बीचवर स्टंट करणे तरुणाच्या अंगलट; 60 लाखांची मर्सिडीज समुद्रात अडकली, पाहा Video...

Big News : लिओनेल मेस्सीने निवृत्तीचा निर्णय घेतला मागे! म्हणाला, आता तर वर्ल्ड चॅम्पियनसारखं खेळायचं आहे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2022 13:13 IST

अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला अन् लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi) निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.

अर्जेंटिनाने वर्ल्ड कप जिंकला अन् लिओनेल मेस्सीने ( Lionel Messi) निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. मेस्सीने २०२२ च्या फिफा वर्ल्ड कप विजयानंतर आंतरराष्ट्रीय कर्तव्यातून निवृत्त होणार नसल्याचे स्पष्ट केले. अर्जेंटिनाने पेनल्टी शूट आऊटवर फ्रान्सवर ४-२ ( ३-३) असा विजय मिळवला आणि मेस्सीने कारकिर्दीत प्रथमच वर्ल्ड कप जिंकला.   

फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात कदाचितच अंतिम सामना एवढा थरारक झाला असेल. ८०व्या मिनिटाला २- ० अशी आघाडी घेणाऱ्या अर्जेंटिनाला गतविजेत्या फ्रान्सने पेनल्टी शूटआऊटपर्यंत नेले... कायलिन एमबाप्पेने १ मिनिट ३७ सेकंदात दोन गोल केले अन् ९० मिनिटांच्या खेळात २-२ अशी बरोबरी राहिली. ३० मिनिटांच्या अतिरिक्त खेळात मेस्सीने १०८व्या मिनिटाला अर्जेंटिनाला ३-२ अशी आघाडी मिळवून दिली, पण एमबाप्पे हार मानणारा नव्हता त्याने ११८व्या मिनिटाला पेनल्टीवर गोल करून  हॅटट्रिक पूर्ण केली आणि सामना ३-३ असा बरोबरीत सोडवला.  

मेस्सीचे वर्ल्ड कप सेलिब्रेशन! आईला मिठी मारून लहान मुलासारखा रडला, पत्नी व मुलांसमोर भावनिक झाला

पेनल्टी शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाच्या मेस्सी, डिबाला, लिएंड्रो पेडेरेस व गोंझालो मॉटेई यांनी गोले केले. फ्रान्सकडून एमबाप्पे व रँडल कोलो मौनी  यांना गोल करता आले, तर किंग्स्ली कोमन व आरेलोना टी चौमेनी  यांनी संधी गमावली. 

मेस्सीची ही पाचवी वर्ल्ड कप स्पर्धा होती आणि त्याची ही शेवटची स्पर्धा असण्याची शक्यता  व्यक्त केली जात होती. मेस्सीनेही फायनलपूर्वी हा शेवटचा वर्ल्ड कप सामना असल्याचे सांगितले होते, परंतु वर्ल्ड कप जिंकल्यानंतर अर्जेंटिनाच्या सुपरस्टारने अजूनही आंतरराष्ट्रीय फुटबॉल खेळण्याची इच्छा असल्यचे स्पष्ट केले. त्याला वर्ल्ड चॅम्पियनचा टॅग असलेली राष्ट्रीय संघाची जर्सी पुन्हा घालायची आहे.

मेस्सीने मोठे पारितोषिक जिंकल्याबद्दल त्याच्या आनंदाबद्दल सांगितले आणि ते साध्य करणे हे त्याचे मोठे स्वप्न असल्याचे सांगितले. मेस्सीच्या दिग्गज कारकिर्दीतील वर्ल्ड कप ही एकमेव गोष्ट होती ज्याने त्याला अनेक ट्रॉफी आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांमध्ये नव्हती, परंतु आता तिही त्याच्या ट्रॉफीच्या कपाटात आली आहे. "हे अविश्वसनीय आहे. मला माहित होते की देव मला चषक देणार आहे, मला खात्री होती. आमच्यासाठी हा एक मोठा आनंद होता. माझे हे खूप मोठे स्वप्न होते, मला माझे करिअर वर्ल्ड कपसह पूर्ण करायचे होते आणि मी करू शकतो. यापेक्षा जास्त विचारू नका,” ऐतिहासिक विजयानंतर मेस्सी म्हणाला. क्रोएशियाविरुद्धच्या उपांत्य फेरीनंतर, मेस्सीने घोषित केले होते की २०२२ ची फायनल हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल. पुढील वर्ल्ड कप २०२६ मध्ये अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिकोमध्ये आयोजित करण्यात येणारा आहे आणि तेव्हा  मेस्सी ३९ वर्षांचा असेल. "अंतिम सामन्यात खेळून माझा वर्ल्ड कप स्पर्धेतील प्रवास पूर्ण करण्यात मला हे यश मिळविता आल्याने खूप आनंद होत आहे. पुढील सामन्यासाठी बरीच वर्षे आहेत आणि मला वाटत नाही की मी ते करू शकेन,” असे अंतिम फेरीत प्रवेश केल्यानंतर मेस्सी म्हणाला होता.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Argentinaअर्जेंटिनाLionel Messiलिओनेल मेस्सीFranceफ्रान्स