शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

फुटबॉलप्रेमाची हद्द झाली राव; 'पाच मिनिटात येतो' सांगून नवरदेवाची मैदानाकडे धाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2019 17:21 IST

फुटबॉलच्या वेडापायी कोण काय करेल याचा नेम नाही...

कोची : फुटबॉलच्या वेडापायी कोण काय करेल याचा नेम नाही... आतापर्यंत फुटबॉलसाठी अनेकांनी परीक्षा बुडवणारे, कौटुंबीक कार्यक्रम, महत्त्वाची मिटींग विसरणारे पाहिले होते. मात्र, आज एक असा किस्सा घडला आणि जगाच्या पाठीवर असा फुटबॉलप्रेमी शोधून सापडणार नाही. केरळच्या रिदवाननं असं काही केलं की त्याच्या या वेडेपणावर हसावे की रागवावे हेच कळेनासे झाले आहे.

केरळ येथे होणाऱ्या मल्लपुरन 7-a-side फुटबॉल स्पर्धेतील फिफा मंजेरी या संघातीत रिदवान हा प्रमुख खेळाडू... मात्र, फिफा मंजेरी संघाच्या या बचावपटूसमोर मोठा पेच निर्माण झाला. संघाची अंतिम लढत आणि त्याच्या लग्नाची तारीख एकाच दिवशी आल्याने त्याच्यासमोर यक्षप्रश्नच निर्माण झाला. त्याला फुटबॉल किंवा लग्न यापैकी एकाचीच निवड करायची होती आणि मंजेरी संघाला त्याची अत्यंत गरज होती.

कोणाच्याही आयुष्यात हा प्रसंग आला तर तो नक्कीच फुटबॉलला दुय्यम प्राधान्य देईल. मात्र, या पठ्ठ्याने लग्नाच्या दिवशी होणाऱ्या नवरीकडे फुटबॉल मॅच खेळण्यासाठी पाच मिनिटे मागून मैदानावर धाव घेतली. नशीबाने तो परत आला तो जेतेपदाचा चषक उंचावूनच. पण, त्याच्या या कृत्याने नवरीकडच्या कुटुंबातील सदस्य प्रचंड नाराज झाले होते. एका सामन्यासाठी रिदवानने केलेले कृत्य पाहून नवरीनेही आश्चर्य व्यक्त केले. जर ही मॅच सायंकाळी असती, तर तु लग्न रद्दही केले असते का, असा सवाल होणाऱ्या नवरीने केला. रिदवानच्या या फुटबॉलप्रेमाची दखल केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन राठोड यांनीही घेतली आणि त्यांनी रिदवानची भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली. 

टॅग्स :Footballफुटबॉल