शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
5
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
6
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
7
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
8
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
9
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
10
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
11
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
12
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
13
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
14
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
15
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
16
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
17
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
18
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
19
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा

रिअल माद्रिदची धुरा सांभाळणार ‘घरचा भिडू’

By सचिन खुटवळकर | Updated: June 13, 2018 19:41 IST

झिदानची जागा घेणार ज्युलन लॉपितेगी

रिअल माद्रिद या स्पेनमधील बलाढ्य फुटबॉल क्लबच्या प्रशिक्षकपदावरून फ्रान्सचा सर्वकालीन सर्वोत्तम खेळाडू झिनेदिन झिदान पायउतार झाल्यानंतर त्याची जागा कोण घेणार, या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे ५१ वर्षीय प्रशिक्षक ज्युलन लॉपितेगी यांची नियुक्ती रिअल माद्रिदच्या प्रशिक्षकपदावर होणार आहे. या पदासाठी विविध देशांचे व क्लबचे २२ प्रशिक्षक/माजी खेळाडू दावेदार होते. मात्र, रिअल माद्रिदच्या व्यवस्थापनाने लॉपितेगी यांच्या नावाला पसंती दिली. रशियामधील फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या समाप्तीनंतर लॉपितेगी राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून पायउतार होऊन रिअल माद्रिदची धुरा हाती घेतील. स्पॅनिश राष्ट्रीय फुटबॉल संघाचे नवे प्रशिक्षक म्हणून ज्युलन लॉपितेगी यांची जागा फर्नांडो हिरो घेणार आहेत.कोण आहेत लॉपितेगी?- स्पेनच्या राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले माजी फुटबॉलपटू ज्युलन लॉपितेगी यांनी गोलरक्षक म्हणून छाप पाडली. रिअल माद्रिद क्लबसाठीही त्यांनी योगदान दिले. १९९४मध्ये फिफा विश्वषचकात त्यांनी स्पेनच्या संघातून सहभाग घेतला.- २00३ सालापासून त्यांनी स्पेनच्या १९ वर्षांखालील तसेच २१ वर्षांखालील संघांची बांधणी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. त्यामुळे देशातील प्रतिभावान खेळाडूंची अचूक ओळख त्यांना आहे. २0१0 ते २0१४ या काळात स्पेनला १९ वर्षांखालील व २१ वर्षांखालील युरोपियन अजिंक्यपद स्पर्धा जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.- २0१४ साली एप्रिलच्या अखेरीस त्यांनी करार संपुष्टात येताच रॉयल स्पॅनिश फुटबॉल फेडरेशनला रामराम करत क्लब फुटबॉल क्षेत्रात शिरकाव केला. पोर्तुगालच्या एफसी पोर्तोने मे २0१४मध्ये त्यांना करारबद्ध केले. या संघात लॉपितेगी यांनी तब्बल ७ स्पॅनिश युवा खेळाडूंना संधी दिली.- २0१६मध्ये विसेंट दे बॉस्क यांच्या निवृत्तीनंतर स्पेनच्या राष्ट्रीय संघाच्या प्रशिक्षकपदी लॉपितेगी यांची नियुक्ती झाली आणि त्यांनी एका नव्या अवकाशाला गवसणी घातली. प्रतिस्पर्धी संघाचा अभ्यास करून नवनव्या चाली रचणे आणि कुशल व्यवस्थापन ही लॉपितेगी यांची वैशिष्ट्ये आहेत.- स्पेनच्या प्रशिक्षकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर रशियात होत असलेल्या फिफा विश्वचषकासाठी संघाला पात्र ठरविण्यासाठी कठोर मेहनत घेतली. २०१० मध्ये विसेंट दे बॉस्क यांनी प्रशिक्षक म्हणून स्पेनच्या विश्वविजयात मोलाची भूमिका बजावली होती.- आता प्रशिक्षकपदावरून पायउतार होण्यापूर्वी स्पेनला रशियामध्ये विश्वविजेतेपद मिळवून देण्यासाठी ज्युलन लॉपितेगी उत्सुक असतील. त्यानंतर रिअल माद्रिदचा हुकमी एक्का तथा पोर्तुगालचा चढाईपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याच्या खेळाला नवे पैलू पाडण्याची जबाबदारी त्यांच्यावर असेल. 

टॅग्स :Footballफुटबॉल