शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

इंटरकॉन्टिनेंटल कप : भारतानेच राखले वर्चस्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2018 00:03 IST

कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव केला. या शानदार विजयासह भारताने चार देशांचा सहभाग असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

मुंबई  - कर्णधार सुनील छेत्रीने नोंदवलेल्या दोन शानदार गोलच्या जोरावर भारताने अंतिम सामन्यात केनियाचा २-० असा पराभव केला. या शानदार विजयासह भारताने चार देशांचा सहभाग असलेल्या इंटरकॉन्टिनेंटल चषक स्पर्धेचे जेतेपद पटकावले.अंधेरी येथील मुंबई फुटबॉल अरेना स्टेडियमवर झालेल्या सामन्यात यजमान भारताचे जेतेपद निश्चित मानले जात होते. पण याआधी अखेरच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या अनपेक्षित पराभवामुळे भारतीयांनी केनियाला गृहीत धरण्याची चूक केली नाही. छेत्रीने भारताला वेगवान सुरुवात करताना आठव्याच मिनिटाला आघाडी मिळवून दिली. यानंतर त्याने पुन्हा एकदा आपला जलवा दाखवताना २९व्या मिनिटाला दुसरा गोल करत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली.मध्यंतरापर्यंत भारताने हीच आघाडी कायम राखत वर्चस्व राखले. दुसऱ्या सत्रात भारताने आणखी वेगवान खेळ करत गोल करण्याचा प्रयत्न केला, पण यश आले नाही. त्याचवेळी भारतीय बचावपटूंनी अप्रतिम संरक्षण करताना केनियाला अखेरपर्यंत आपल्या गोलक्षेत्रापासून दूर ठेवले. या शानदार जेतेपदासह आगामी २०१९ मध्ये यूएई येथे होणाºया आशिया चषक स्पर्धेसाठी आपण सज्ज असल्याचे भारतीय संघाने सिद्ध केले आहे.मेस्सीची केली बरोबरीअंतिम सामन्यात २ गोल नोंदवत छेत्रीने सध्या सक्रिय असलेल्या फुटबॉलपटूंमध्ये देशासाठी सर्वाधिक गोल करण्यामध्ये दुसरे स्थान पटकावले. तसेच, त्याने याबाबतीत अर्जेंटिनाचा स्टार लिओनेल मेस्सी याचीही बरोबरी केली.या दोन्ही दिग्गज फुटबॉलपटूंच्या नावावर प्रत्येकी ६४ गोलची नोंद झाली आहे. अव्वल स्थानी पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो असून त्याने १५० सामन्यांतून ८१ गोल केले. देशासाठी सर्वाधिक गोल करणाºयांच्या एकूण क्रमवारीत मेस्सी व छेत्री संयुक्तपणे २१व्या स्थानी आहेत.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतSportsक्रीडाnewsबातम्या