शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

France vs Croatia, WC Final Live: चुकीला माफी नाही.... क्रोएशियाचा आत्मघात

By स्वदेश घाणेकर | Updated: July 15, 2018 21:29 IST

पेरिसिचचा अप्रतिम गोल वगळता क्रोएशियाच्या खेळात फार वैशिष्ट जाणवले नाही. त्यांनी चुका केल्या नसत्या तर पहिल्या सत्रातील निकाल क्रोएशियाच्या बाजूने 1-0 असा असता. येथे चुकीला माफी नाही... हेच पुन्हा जाणवले.

- स्वदेश घाणेकर: दडपणात क्रोएशियाचा खेळ अधिक बहरतो, याची प्रचिती संपूर्ण स्पर्धेत आली आणि फ्रान्सविरूद्धच्या अंतिम सामन्यातही त्यांनी तसाच खेळ केला. विश्वचषक स्पर्धेची पहिली अंतिम लढत खेळणा-या क्रोएशियाच्या खेळाडूंनी माजी विजेत्या फ्रान्सला घाम गाळण्यास भाग पाडले. पहिल्या 15 मिनिटांत त्यांच्याकडून गोल गोल करण्याचे दोन सुरेख प्रयत्न झाले. पेरिसिच आणि मँडझुकीच यांनी फ्रान्सच्या बचावपटूंची कसोटी पाहिली पण फ्रान्स डिफेंडर उमटीटी आणि पव्हार्ड यांनी पेनल्टी क्षेत्रात चोख कामगिरी बजावताना क्रोएशियाला यश मिळू दिले नाही. मात्र 18 व्या मिनिटाच्या त्या गोलने क्रोएशियाला मोठा धक्का दिला. आक्रमणाची धुरा वाहणा-या मँडझुकीचच्या डोक्याला लागून चेंडू क्रोएशियाच्याच गोलजाळीत विसावला. या गोलनंतर क्रोएशियाने पुनरागमन केले, परंतु पुन्हा एकदा त्यांना चुकीचा फटका बसला. अँटोइने ग्रिझमनने पेनल्टी स्पॉट किकवर गोल करत फ्रान्सला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. आश्चर्यकारक निकाल नोंदवून अंतिम फेरीपर्यंत धडकलेल्या क्रोएशियाचा खेळ विस्कळीत जाणवला. त्याचा फ्रान्सलाच फायदा झाला. चेंडूवर सर्वाधिक ताबा राखूनही क्रोएशियाला वर्चस्व गाजवता आले नाही. मँडझुकीचच्या चुका त्यांना चांगल्याच महागात पडल्या. दोन्ही संघांनी यावेळी फॉरमेशनमध्ये 4-2-3-1 असा बदल करताना आक्रमणावर भर दिला. चेंडूवर 61 टक्के ताबा क्रोएशियाकडे होता आणि त्यांच्याकडून गोल करण्याचे 7 प्रयत्न झाले. पण, फ्रान्सने आक्रमणाबरोबर बचावातही उजवी कामगिरी केली. पेरिसिचचा अप्रतिम गोल वगळता क्रोएशियाच्या खेळात फार वैशिष्ट जाणवले नाही. त्यांनी चुका केल्या नसत्या तर पहिल्या सत्रातील निकाल क्रोएशियाच्या बाजूने 1-0 असा असता. येथे चुकीला माफी नाही... हेच पुन्हा जाणवले.   

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा