शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
4
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
5
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
6
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
7
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
8
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
9
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
10
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
11
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
12
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
13
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
14
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
15
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
16
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
17
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
18
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
19
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
20
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
Daily Top 2Weekly Top 5

चार वेळचा विश्वविजेता इटली 60 वर्षांत प्रथमच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयशी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2017 13:38 IST

स्वीडनसोबतची लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्याने चार वेळचा विश्वविजेता असलेल्या इटलीचे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे.

मिलान - फुटबॉलच्या मैदानात काल एक धक्कादायक निकाल नोंदवला गेला. 2018 साठीच्या फिफा फुटबॉल विश्वचषक पात्रता स्पर्धेत स्वीडनसोबतची लढत गोलशून्य बरोबरीत सुटल्याने चार वेळचा विश्वविजेता असलेल्या इटलीचे फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्याचे आव्हान संपुष्टात आले आहे. तर स्वीडनने 2006 नंतर प्रथमच फुटबॉल विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात यशस्वी झाला आहे. चार वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या इटलीच्या संघाला गेल्या 60 वर्षांत प्रथमच विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात अपयश आले आहे.स्टॉकहोम येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात इटलीला स्वीडनकडून 1-0 अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता. त्यामुळे विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यासाठी इटलीला स्वीडनवर विजय मिळवणे आवश्यक होते. त्या सामन्यात स्वीडनचा फुटबॉलपटू जेकब योहानन याने 61 व्या मिनिटाला गोल करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. दरम्यान, सोमवारी झालेल्या लढतीतही दोन्ही संघांमध्ये चुरशीची लढत पाहायला मिळाली. पण या सामन्यात गोल करण्यात दोन्हीकडे खेळाडू अपयशी ठरले. त्यामुळे अखेरीस ही लढत गोलशून्य बरोबरीत समाप्त झाली. सामना संपल्याची घोषणा होताच निराश इटलीच्या खेळाडूंच्या डोळ्यात पाणी आले. तर दीर्घकाळानंतर विश्वचषकासाठी पात्र ठरल्याने स्वीडनच्या खेळाडूंनी आनंदोत्सव साजरा सुरू केला. हा सामना पाहण्यासाठी इटलीचे पाठीराखे मोठ्या संख्येने उपस्थित होते. चार वेळा विश्वचषक जिंकणारा इटलीचा संघ या सामन्यात सहज बाजी मारेल अशी अपेक्षा त्यांना होती. मात्र त्यांचाही हिरमोड झाला. याआधी 1958 च्या फिफा विश्वचषक स्पर्धेसाठी पात्र ठरण्यात इटलीला अपयश आले होते. आतापर्यंत केवळ तीन वेळा इटलीला विश्वचषक स्पर्धेत खेळता आलेले नाही. 1930 साली जेव्हा फुटबॉल विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदा खेळवली गेली होती तेव्हा इटलीच्या संघाने त्या स्पर्धेत सहभाग घेतला नव्हता.   

टॅग्स :FootballफुटबॉलSportsक्रीडा