शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

FIFA World Cup Quarter finals : निर्धारीत वेळेत बरोबरीची कोंडी कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 08, 2018 1:14 AM

क्रोएशिया आणि रशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील लढत निर्धारीत वेळेतही 1-1 अशा बरोबरीत सुटली. अतिरिक्त पाच मिनिटांत कोणालाही विजयी गोल करता आला नाही. 

सोची - क्रोएशिया आणि रशिया यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीतील लढत निर्धारीत वेळेतही 1-1 अशा बरोबरीत सुटली. अतिरिक्त पाच मिनिटांत कोणालाही विजयी गोल करता आला नाही. 

विश्वचषक फुटबॉलच्या उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत क्रोएशियाने पिछाडीवरून मुसंडी मारताना यजमान रशियाला पहिल्या सत्रात 1-1 असे बरोबरीत रोखले होते. उपांत्यपूर्व फेरीत आक्रमक सुरूवात करून पहिला गोल नोंदवून आघाडी घेण्याच्याच रणनितीने दोन्ही संघ मैदानात उतरले होते. त्यामुळे सुरूवातीपासूनच सामन्यावर नजर खिळून राहिली. धक्कातंत्र देत इथवर धडकलेल्या क्रोएशियाने चेंडूवरील ताबा आणि अचुकतेच्या बाबतीत रशियापेक्षा वरचढ खेळ केला. मात्र डेनीस चेरिशेव्हच्या अप्रतिम गोलने क्रोएशियाची एकाग्रता भंग केली. योग्य ताळमेळ आणि निर्णयक्षमता याच्या जोरावर चेरिशेव्हने पेनल्टी क्षेत्राबाहेरून क्रोएशियाच्या दोन बचावपटूंना चकवत सुरेख गोल केला. चेरिशेव्हने टोलावलेल्या चेंडूच्या दिशेचा गोलरक्षकाने अंदाज बांधण्याआधीच हा गोल झाला होता. त्यानंतर क्रोएशियाच्या खेळाडूंचे मनोबल खचले आणि त्यांच्याकडून फाउल झाले. पण 39व्या मिनिटाला आंद्रेज क्रॅमनीचच्या हेडरव्दारे केलेल्या गोलने क्रोएशियाने बरोबरी साधली. क्रोएशियाच्या या पलटवाराने रशियाचे प्रशिक्षक प्रचंड वैतागले.  दुस-या सत्रात दोन्ही संघांनी संयमाने खेळ केला. कोणतीही घाई अंगलट येऊ शकते याची कल्पना असल्याने दोन्ही संघ सावध खेळावर भर दिलेला. अधुनमधुन आक्रमण करत होते, बचावपटूंच्या सुरेख खेळासमोर त्यांना यश मिळवता येत नव्हते. सामन्याच्या 60व्या मिनिटाला क्रोएशियाची आघाडी थोडक्यात हुकली. रशियन पेनल्टी क्षेत्रात क्रोएशियाच्या खेळाडूंनी केलेल्या आक्रमणाने गोलरक्षक अॅकिनफिव्हलाही पुढे येण्यास भाग पाडले. हीच संधी हेरून इव्हान पेरिसीचने चेंडू शितीफीने गोलजाळीच्या दिशेने तटवला. पण, क्रोएशियाचे नशीब खराब असल्याने चेंडू गोलपोस्टवर आदळून माघारी फिरला. यावर क्रोएशियाच्या खेळाडूंसह प्रशिक्षकांना विश्वास बसेनासा झाला. तर रशियाच्या खेळाडूंनी सुटकेचा निश्वास टाकला. त्यानंतर बराच काळ रशियाचे खेळाडू दबावाखाली दिसले. तरीही त्यांनी यजमानांना साजेसा खेळ केला. पण अखेरच्या दहा मिनिटात त्यांच्यावरील दडपण अधिक वाढले. क्रोएशियाचा खेळ वरचढ ठरत असताना प्रेक्षक रशियाच्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्याचे काम करत होते. खेळांडूपेक्षा रशियाचे प्रशिक्षक प्रचंड तणावात दिसले. पण दोघांनी संयमाने खेळ केला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Croatiaक्रोएशियाrussiaरशियाFootballफुटबॉलSportsक्रीडा