शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

FIFA World Cup Quarter finals :  28 वर्षांनंतर इंग्लंड उपांत्य फेरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2018 21:33 IST

पेनल्टी शूटआऊट मधील थरारक विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडच्या संघाने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत रणनितीची योग्य अंमलबजावणी करताना स्वीडनला 2-0 अशी हार मानण्यास भाग पाडले. 1990 नंतर प्रथमच इंग्लंडने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

समारा - पेनल्टी शूटआऊट मधील थरारक विजयानंतर आत्मविश्वास उंचावलेल्या इंग्लंडच्या संघाने फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत रणनितीची योग्य अंमलबजावणी करताना स्वीडनला 2-0 अशी हार मानण्यास भाग पाडले. 1990 नंतर प्रथमच इंग्लंडने विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. 

 

या सामन्यात इंग्लंडने पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या तीस मिनिटांच्या रटाळ खेळानंतर 30व्या मिनिटाला हॅरी मॅग्युरेचाने गोल केला. त्यानंतर सामन्यातील चढाओढ वाढली. दोन्ही संघाकडून त्यानंतर आक्रमक खेळाला सुरूवात केली. पण, स्वीडनला बरोबरी मिळवण्यात अपयश आले. 2002च्या विश्वचषक स्पर्धेनंतर उपांत्यपूर्व फेरीत गोल करणारा मॅग्युरेचा हा इंग्लंडचा पहिलाच खेळाडू ठरला. 16 वर्षांपूर्वी मिचेल ओवेन यांनी उपांत्यपूर्व फेरीत ब्राझीलविरूद्ध गोल केला होता. इंग्लंड आणि स्वीडन यांच्यात आतापर्यंत 24 सामने झाले असून उभय संघांनी अनुक्रमे 8 व 7 विजय मिळवले आहेत, तर 9 सामने बरोबरीत सुटले. त्यात इंग्लंडने पहिल्या सत्रात खाते उघडून आणखी एका विजयाच्या दिशेने कूच केली होती. दुस-या सत्रात इंग्लंडचेच वर्चस्व जाणवले. चेंडू अधिक काळ हा स्वीडनच्याच बचावक्षेत्रात खेळता ठेवत इंग्लंडने सातत्याने गोलचे प्रयत्न सुरू ठेवले. अखेरीस 59व्या मिनिटाला इंग्लंडला प्रतिस्पर्धीची बचावफळी भेदता आली. जेस अलीच्या क्रॉसपासवर डेल अलीने हेडरव्दारे गोल करून इंग्लंडला फ्रंटसीटवर बसवले. त्यानंतर स्वीडनकडून झालेले प्रयत्न गोलरक्षक जॉर्डन पिकफोर्डने सुरेखरित्या अडवले. आघाडीनंतरही इंग्लंडच्या आक्रमणाची धार बोथट झाली नाही. स्वित्झर्लंडला नमवून अंतिम आठमध्ये प्रवेश करणारा स्वीडनचा संघ या लढतीत गोंधळलेला दिसला. त्यांच्या प्रयत्नांना यश येत नव्हते.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Englandइंग्लंडFootballफुटबॉलSportsक्रीडा