शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : क्रोएशियाचा नायजेरियावर दिमाखदार विजय, 'ड' गटात पहिल्या स्थानी विराजमान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 02:55 IST

फिफा विश्वचषक स्पर्धेत क्रोएशियानं मधल्या फळीतील बलाढ्य खेळाडूंच्या जोरावर नायजेरियावर मात केली.

सेंट पीटर्सबर्ग-  कर्णधार लुका मॉड्रिक याने (71व्या मिनिटाला) पेनल्टीवर मारलेल्या गोलमुळे क्रोएशियाने फिफा विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात ‘आफ्रिकन पॉवर हाऊस’ नायजेरियाचा 2-0ने पराभव केला. त्याआधी नायजेरियाचा मिडफिल्डर व ‘सर्वोत्तम पासेस देणारा’ खेळाडू अशी ख्याती असलेल्या ओघेनेकारो इटेबो याला मोठी चूक भोवली. त्याने 32व्या मिनिटाला स्वयंगोल नोंदविल्यामुळे मध्यंतरापर्यंत ‘ड’ गटाच्या सामन्यात क्रोएशिया 1-0ने आघाडीवर होता.

क्रोएशियाचा मांडझोकारोने मारलेला हेडर डिफ्लेक्ट होऊन इटेबोच्या पायाला लागला. नायजेरियाचा गोलकिपर ओझोहो याला काही कळण्या आधीच चेंडू गोलजाळीत स्थिरावल्याने क्रोएशियाला आनंद साजरा करण्याची संधी मिळाली. 70व्या मिनिटाला नायजेरियाचा ट्रूस्ट इकाँग याने प्रतिस्पर्धी खेळाडूला डीमध्ये अडथळा आणून खाली पाडल्याने रेफ्रीने पेनल्टी बहाल केली होती. त्यावर पाचयांदा विश्वचषक खेळणा-या मॉड्रिकने गोलजाळीचा वेध घेत विश्वचषकात पहिला गोल नोंदविला.  क्रोएशियाने 1998साली फ्रान्समध्ये उपांत्य फेरी गाठली होती. त्यांनी उपांत्यपृर्व सामन्यात जर्मनीला धूळ चारली होती. दुसरीकडे नायजेरिया संघात इंग्लिश लीग खेळणारे अनेक खेळाडू असल्यामुळे क्रोएशियावर ते भारी पडू शकतात, असा अनेकांचा समज होता. पण पारडे फिरले. क्रोएशियाने नायजेरियाच्या खेळाडूंना निष्प्रभ ठरविले.  नायजेरिया सराव सामन्यात इंग्लंड आणि  झेक प्रजासत्तकाकडून पराभूत झाला आहे. नायजेरियाची ओळख सुपर ईगल्स अशी असून विश्वचषकातील सर्वांत युवा संघ म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. आज त्यांना क्रोएशियाची बचावफळी भेदणे कठीण गेले.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८