शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
2
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
3
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
4
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
5
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
6
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
7
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
8
धनंजय मुंडेंनी माफी मागावी! ‘वंजारा-बंजारा एकच’ वक्तव्यावरून बंजारा समाज आक्रमक
9
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
10
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
11
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
12
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
IPO News: १८ सप्टेंबरला उघडणार 'या' कंपनीचा ५६०.२९ कोटी रुपयांचा IPO; काय आहेत डिटेल्स?
14
अंत्ययात्रा काढली, चितेवर ठेवलं, पण मुखाग्नी देणार तोच जिवंत झाली महिला, आता अशी आहे प्रकृती
15
इंदिरा एकादशी २०२५: पितरांना मोक्ष देणारी इंदिरा एकादशी; तुळशीचा 'असा' वापर आठवणीने टाळा
16
'श्रीयुत गंगाधर टिपरे' मालिकेचा इंटरेस्टिंग किस्सा, आबांच्या भूमिकेतील दिलीप प्रभावळकर म्हणाले...
17
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
18
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
19
एक घर अन् ४२७१ मतदार! निवडणूक तोंडावर अन् AIने केली पोलखोल; कुठे घडला हा प्रकार?
20
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video

FIFA World Cup 2022: पोर्तुगालचा कसाबसा विजय, घानाने दिली कडवी टक्कर, रोनाल्डोचा विक्रमी गोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2022 06:54 IST

FIFA World Cup 2022: स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तोयानो रोनाल्डोने गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिल्यानंतर घानाने जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे पोर्तुगालने चांगल्या सुरुवातीनंतरही घानाविरुद्ध ३-२ अशा विजयावर समाधान मानले.

दोहा : स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तोयानो रोनाल्डोने गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिल्यानंतर घानाने जोरदार प्रत्युत्तर दिले. यामुळे पोर्तुगालने चांगल्या सुरुवातीनंतरही घानाविरुद्ध३-२ अशा विजयावर समाधान मानले. घानाने अखेरच्या मिनिटापर्यंत जबरदस्त झुंज देत पोर्तुगीज संघाचा घाम काढला. पाच वेगवेगळ्या विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनाल्डो पहिला फुटबॉलपटू ठरला. ह गटात झालेल्या या लढतीत सर्वांच्या नजरा रोनाल्डोवर खिळल्या होत्या. त्याने आपल्या चाहत्यांना निराश न करता शानदार खेळ करत संघाला आघाडीवरही नेले. मात्र, नंतर त्याला मैदानाबाहेर बोलावण्यात आल्यानंतर घानाने जवळपास सामना पोर्तुगालच्या हातून खेचलाच होता. याआधी, २०१४ च्या विश्वचषक साखळी सामन्यात घानाने पोर्तुगालला झुंजवले होते. त्यावेळी पोर्तुगालने २-१ अशी बाजी मारली होती. घानाने यावेळीही काहीसा तसाच खेळ केला. सामन्याच्या पहिल्या सत्रात गोलशून्य बरोबरी राहिली.दुसऱ्या सत्रात ६५व्या मिनिटाला रोनाल्डोने पेनल्टी किकवर विश्वविक्रमी गोल करत पोर्तुगालला आघाडीवर नेले. यानंतर घानाचा कर्णधार आंद्रे एयू याने संघाला शानदार बरोबरी साधून दिली. घाना बाजी पलटवणार असे दिसत असताना जोआओ फेलिक्सने ७८व्या मिनिटाला आणि राफेल लियाओने ८०व्या मिनिटाला गोल करत पोर्तुगालला ३-१ अशी भक्कम आघाडी मिळवून दिली. पोर्तुगाल सहज विजय मिळवणार असे चित्र असताना घानाच्या ओसमान बुकारीने ८९व्या मिनिटाला गोल करत सामन्यात ३-२ असे रंग भरले. निर्धारित वेळेनंतर मिळालेल्या अतिरिक्त वेळेत पोर्तुगालचा गोलरक्षक डिओगो कोस्टाकडून मोठी चूक झाली. त्याने चेंडू सोडलेला असताना, त्याच्या मागे असलेल्या घानाच्या विलियम्सनने चेंडूवर ताबा मिळवला, मात्र पोर्तुगीज मध्यरक्षकाच्या प्रसंगावधानाने हा गोल झाला नाही. अन्यथा पोर्तुगालचा विजय थोडक्यात हुकला असता. 

< सलग पाच विश्वचषक स्पर्धांमध्ये गोल करणारा रोनल्डो पहिला फुटबॉलपटू ठरला. तर तीन विश्वचषक स्पर्धांमध्ये पेनल्टी किकवर गोल करणारा रोनाल्डो पहिला फुटबॉलपटू ठरला.< विश्वचषकात गोल करणारा ३७ वर्षीय रोनाल्डो हा कॅमरुनचा रॉजर मिलानंतरचा दुसरा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. रॉजरने १९९४ मध्ये वयाच्या ४२व्या वर्षी गोल केला होता. < रोनाल्डोने विश्वचषकात पोर्तुगालकडून गोल करणारा सर्वात युवा खेळाडूसह सर्वात वयस्कर खेळाडूचाही विक्रम आपल्या नावावर केला.  

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Portugalपोर्तुगाल