शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2022 :  पोरींनो नीट कपडे घाला, अन्यथा खावी लागेल 'जेल'ची हवा! फुटबॉल फॅन्सची वाढलीय डोकेदुखी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2022 09:36 IST

फुटबॉलचा सर्वात मोठी स्पर्धा FIFA World Cup 2022, येत्या रविवारी म्हणजेच २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी चाहतेही सज्ज झाले आहेत.

फुटबॉलचा सर्वात मोठी स्पर्धा FIFA World Cup 2022, येत्या रविवारी म्हणजेच २० नोव्हेंबरपासून कतारमध्ये सुरू होणार आहे आणि त्यासाठी चाहतेही सज्ज झाले आहेत. पण, मध्य-पूर्व देशातील हा वर्ल्ड कप गेल्या काही काळापासून वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. मानवाधिकार उल्लंघनापासून ते देशात बनावट चाहते आणण्यापर्यंतच्या अनेक मुद्द्यांमुळे हा वर्ल्ड कप चर्चेत आला आहे. आता आणखी एक मुद्दा समोर आला आहे, जो वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वीच वादग्रस्त बनलेल्या गोष्टींच्या यादीत भर घालतो.

बाबो! गर्लफ्रेंड्ससाठी 'पाण्या'सारखा पैसा; इंग्लंडच्या फुटबॉलपटूंनी बुक केलं ९६८९ कोटींचं हॉटेल, Photo

आपल्या फुटबॉल टीमला चिअर करण्यासाठी इतर देशांतून आलेल्या महिला चाहत्यांना नीट कपडे घालण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसे न केल्यास त्यांना कतार येथील कायद्यानुसार तुरुंगात जावे लागू शकते. कतारमधील कायद्यांनुसार महिलांना त्यांच्या शरीराचे अवयव सार्वजनिक ठिकाणी दाखवण्यास बंदी आहे आणि हा दंडनीय गुन्हा आहे. तथापि, फिफाच्या वेबसाइटवर असे म्हटले आहे की महिलांना त्यांच्या आवडीचे कपडे घालण्याची परवानगी आहे, परंतु त्यांनी कतारमध्ये प्रचलित असलेल्या कायद्यांचा आदर आणि जाणीव ठेवली पाहिजे. 

 "लोक साधारणपणे त्यांच्या आवडीचे कपडे घालू शकतात. संग्रहालये आणि इतर सरकारी इमारतींसारख्या सार्वजनिक ठिकाणी भेट देताना पाहुण्यांनी त्यांचे खांदे आणि गुडघे झाकणे अपेक्षित आहे," असे फिफाची वेबसाइट सांगते. सनने दिलेल्या वृत्तानुसार, कतारमध्ये महिलांना शॉर्ट कपडे घालण्यास बंदी आहे. गर्दीत कोणी पुरुष असो किंवा महिला यांनी सामना सुरू असताना त्यांचा शर्ट काढून जल्लोष केला, तरी त्यांना जेल होऊ शकते. स्टेडियममध्ये असे कॅमेरे आहेत की ते कृत्य पकडू शकतात आणि त्या व्यक्तीला तुरुंगात टाकू शकतात.

"आमच्याकडे विशिष्ट सीटवर झूम इन करण्यासाठी आणि प्रेक्षकाला स्पष्टपणे पाहण्यासाठी उच्च-रिझोल्यूशनचे विशेष कॅमेरे आहेत.  ज्यामुळे आम्हाला कोणत्याही कार्यक्रमानंतरच्या तपासात मदत होईल," असे कतारमधील फिफा वर्ल्ड कपचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२QatarकतारFootballफुटबॉल