शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : मेस्सीची 'किक' चुकली, अर्जेंटिनाला बरोबरीची 'पेनल्टी'; आईसलँडचा 'कूssल' खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 20:49 IST

माजी विजेत्या अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखून इवल्याशा आईसलँडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दणक्यात पदार्पण साजरे केले. ‘ड’ गटाच्या या सामन्यात आईसलँडच्या विजयाचे शिल्पकार त्यांचा गोलरक्षक हॅनेस हॅलडोर्सन व २३ व्या मिनिटाला गोल करणारा आल्फ्रेड फिनबॉसन हे ठरले.

मॉस्को : माजी विजेत्या अर्जेंटिनाला १-१ असे बरोबरीत रोखून इवल्याशा आईसलँडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत दणक्यात पदार्पण साजरे केले. ‘ड’ गटाच्या या सामन्यात आईसलँडच्या विजयाचे शिल्पकार त्यांचा गोलरक्षक हॅनेस हॅलडोर्सन व २३ व्या मिनिटाला गोल करणारा आल्फ्रेड फिनबॉसन हे ठरले. अर्जेंटिनासाठी स्टार लियोनेल मेस्सीने ६४ व्या मिनिटाला गमावलेली पेनल्टी ही विजयापासून वंचित ठेवणारी ठरली.सामन्याचे दोन्ही गोल पहिल्या सत्रात झाले. मध्यतरानंतर एकही गोल झाला नाही. अर्जेंटीनासाठी गोल सर्जिओ अगुरो याने १९ व्या मिनिटाला गोल केला तर आईसलँडसाठी  आल्फ्रेड फिनबॉसन याने २३ व्या मिनिटाला बरोबरी साधली. अर्जेंटिनाचा संघ गेल्या तीन विश्वचषक स्पर्धात आपल्या गटात पहिल्या स्थानी राहिला आहे परंतु आज विजय हुकल्यावर त्यांची ही मालिका यंदा खंडीत होण्याची भिती आहे. याशिवाय अर्जेंटिनाने गेल्या सहा विश्वचषकात आपला सलामी सामना जिंकून विजयी सुरूवात केली होती, ती परंपरासुद्धा आज खंडीत झाली. अगुरो आणि फिन्नबॉगसन यांच्या गोलांमुळे सामना मध्यंतरावेळी १-१ बरोबरीत होता. विश्वचषक स्पर्धेत पहिल्यांदाच खेळणा-या आईसलँडने निश्चितपणे या सत्रात दमदार खेळ करून मने जिंकली. ते कोणत्याही दडपणात दिसले नाही आणि सुनियोजीतरित्या खेळतांना दिसले. चेंडूवर ताबा मिळाल्यावर त्याचा उपयोग करून घेताना ते दिसले. त्यांच्या पासेसही चांगल्या झाल्या. सामन्याच्या १९ व्या मिनिटालाच सर्जियो अगुरोने अर्जेंटिनाला आघाडी मिळवून दिली. त्याने डाव्या फळीकडून मार्कोस रोजोच्या पासवर डाव्या पायाने चेंडू गोलपोस्टच्या छताला भिरकावला. मात्र या गोलच्या कुठल्याही दडपणात न येता आईसलँडने खेळ करत २३ व्या मिनिटाला बरोबरी साधली.त्यांच्या अल्फ्रेड फिनबॉगसन याने चतुराईने हा गोल केला. गोलपोस्टच्या पुढ्यात सिगुर्डसनने दिलेल्या हळूवार पासवर त्याने फक्त चेंडूला गोलपोस्टकडे दिशा देण्याचे काम केले आणि सामना बरोबरीवर आणला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉलrussiaरशिया