शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीला पराभवाचा धक्का; 1-0 ने विजयी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2018 03:40 IST

इर्विग लोजाना याच्या एका गोलच्या बळावर मॅक्सिकोनं जर्मनीवर 1-0नं मात केली.

मॉस्को : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोने ‘फ’ गटाच्या पहिल्याच सामन्यात १ -० ने पराभूत करून खळबळ उडवून दिली. हिरविंग लुझानो याने ३५व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर मेक्सिकोने बलाढ्य जर्मनीवर हा विजय मिळवला. गेल्या विश्वचषकातही गतविजेत्यांना पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.हा सामना लुझियानी स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात थॉमस म्युलरच्या नेतृत्वात जर्मनीने काहीसा दिशाहीन खेळ केला. सुरूवातीला मिळालेल्या संधीवर जर्मनीला यश मिळवता आले नाही. मेक्सिकोने जोरदार प्रतिआक्रमण करत गोल केला. ३५ व्या मिनिटाला लुझानो याने जर्मनीचा गोलकिपर मॅन्युअल नेअर याला चकवा देत बॉलला गोलजाळ््यात पाठवले. त्याच्या कारकिर्दीतील हा आठवा गोल होता. लुझानोच्या या गोलनंतर लगेचच एका मिनिटात जर्मनीला फ्री कीक मिळाली होती. मात्र त्यावर जर्मनीच्या संघाला बरोबरी साधता आला नाही.गतविजेत्या जर्मनीच्या संघाने पहिल्या हाफमध्ये जबरदस्त आक्रमक खेळ करताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलपोस्टवर तब्बल १० वेळा हल्ले केले. यावेळी मेक्सिकोला ही लढत कठीण जाणार असेच चित्र होते. मात्र, नंतर मेक्सिकोने मोक्याच्यावेळी संधी साधताना चित्र पालटले. जर्मनीने या आधी १९९४ मध्ये विश्वचषकात कोरियाच्याविरुद्ध पहिल्या हाफमध्ये आक्रमक खेळ करताना १० हल्ले केले होते. >मेक्सिकोच भक्कम बचावया सामन्यात जर्मनीने एकुण २५ वेळा मेक्सिकोच्या गोलपोस्टवर आक्रमण केले मात्र दिशाहीन शॉट आणि मेक्सिकोच्या गुईलिमिरो ओईचा याच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे जर्मनीच्या बलाढ्य संघाला गोल नोंदवता आला नाही.अतिरिक्त वेळेत गोलरक्षक नेअर सहीत जर्मनीचे सर्वच्या सर्व अकरा खेळाडू मेक्सिकोवर आक्रमण करत होते. मात्र मेक्सिकोच्या बचाव फळीने आपली अभेद्यता कायम राखली.विश्वचषकात पहिल्याच सामन्यात पराभूत होणारा जर्मनी हा पहिला गतविजेता संघ नाही. या आधीच्या स्पर्धात स्पेन, फ्रान्स आणि अर्जेंटिना हे गतविजेते पराभूत झाले होते.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल