शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2018: विजयाचे गिफ्ट देणारे आत्मघाती गोल, विश्वचषकात आतापर्यंत ४२ स्वयंगोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 16:43 IST

विश्वचषकासारखी सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्यातील सामन्यात एकच गोल होत असेल, तोसुद्धा सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला आणि तो गोल एखाद्याने स्वत:च्याच संघाविरुद्ध केलेला असेल तर त्याच्याएवढी घोर निराशा दुसरी नाही! अशीच घोर निराशा शुक्रवारी मोराक्कन फुटबॉलप्रेमींच्या पदरात पडली.

- ललित झांबरे 

विश्वचषकासारखी सर्वात प्रतिष्ठेची स्पर्धा आणि त्यातील सामन्यात एकच गोल होत असेल, तोसुद्धा सामन्याच्या शेवटच्या मिनिटाला आणि तो गोल एखाद्याने स्वत:च्याच संघाविरुद्ध केलेला असेल तर त्याच्याएवढी घोर निराशा दुसरी नाही! अशीच घोर निराशा शुक्रवारी मोराक्कन फुटबॉलप्रेमींच्या पदरात पडली.इराकला पूर्ण वेळ गोलशून्य आणि त्यानंतरही अतिरिक्त वेळेत पाचव्या मिनिटापर्यंत बरोबरीत रोखल्यावर नेमक्या अखेरच्या मिनिटाला नको ते घडले. इराणच्या एहसान हाजी साफीने मारलेली किक अडविण्याच्या प्रयत्नात अजीज बहादुजने हेडर मारला खरा, परंतु चेंडू त्यांच्याच गोलजाळ्यात गेला आणि इराणला ध्यानीमनी नसताना विश्वचषकात विजयाचे गिफ्ट मिळाले. आंद्रेस एस्कोबारची गोळ्या घालून झालेल्या हत्येची उगाच आठवण झाली पण,  मोराक्कोच्या पराभवाचे कारण ठरलेल्या या आत्मघाती गोलाचे काय पडसाद तिकडे मोराक्कोत उमटतील ते माहित नाही, परंतु सामन्यात झालेला एकमेव गोल हा आत्मघाती गोल असलेला विश्वचषक इतिहासातील हा केवळ दुसराच सामना आहे. याआधी २००६ च्या विश्वचषकात पेराग्वेच्या कार्लोस कमाराच्या आत्मघाती गोलमुळे इंग्लंडला असेच विजयाचे गिफ्ट मिळाले होते. कमाराने सामन्याच्या तिसºयाच मिनिटाला ही घोडचूक केली होती परंतु त्यानंतर पूर्णवेळ खेळ होऊनही ते या चुकीची भर काढू शकले नव्हते आणि पेराग्वेला त्या सामन्यात १-० अशी हार पत्करावी लागली होती. बहादुजचे दु:ख हलके करणारी बाब एकच, ती  अशी की अशी स्वयंगोलाची चूक करणारा तो काही पहिलाच मोराक्कन खेळाडू नाही. त्याच्याआधीही १९९८ च्या विश्वचषकात मोराक्कोच्या युसुफ चोप्पोने अशीच चूक केली होती. त्यावेळच्या नियमानुसार मध्यंतरानंतर अतिरिक्त वेळेच्या पहिल्याच मिनिटाला त्याने आपल्याच संघाविरुद्ध गोल करून लढत त्यावेळी १-१ बरोबरीवर आणून ठेवली होती. युसुफच्या सुदैवाने पुढे मोराक्कोने तो सामना २-२ असा बरोबरीत सोडवला होता. बहादुजच्या आधी विश्वचषक सामन्याच्या अतिरिक्त वेळेत केवळ एकच आत्मघाती गोल झाला होता. तो गेल्या विश्वचषक स्पर्धेत नायजेरियाच्या जोसेफ योबो याने अतिरिक्त वेळेतील दुसऱ्या मिनिटाला फ्रान्सला बहाल केला होता आणि नायजेरियाने तो सामना २-० ने गमावला होता. नोंदीसाठी म्हणून विश्वचषक फुटबॉलच्या इतिहासात आतापर्यंत ४२ स्वयंगोल नोंदले गेले आहेत आणि असे गोल झालेल्या सामन्यांपैकी ३० सामने चूक करणा-या संघाने गमावले आहेत तर फक्त सहा सामने जिंकले आहेत. उर्वरीत सहा सामने बरोबरीत सोडविण्यात स्वयंगोलाची चूक करणारे संघ यशस्वी ठरले आहेत.