शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Fifa World Cup 2018: पेनल्टी किकची कमाल, पोग्बाची धमाल... फ्रान्सची ऑस्ट्रेलियावर सरशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2018 03:22 IST

फिफा विश्वचषकातील फुटबॉल सामन्यात फ्रान्सने बाजी मारली. ऑस्ट्रेलियासोबत कडवी झुंज देत फ्रान्सने या सामन्यात 2-1 ने विजय मिळविला. 

कजान : फिफा विश्वचषक स्पर्धेत क गटातील पहिल्या लढतीत बलाढ्य फ्रान्सने आॅस्ट्रेलियाला २-१ गोलने पराभूत केले. फ्रान्सच्या अ‍ॅँटोनी ग्रीझमानने वॉर प्रणालीचा वापर करून मिळालेल्या पेनल्टीवर गोल केला. फिफा विश्वचषक स्पर्धेतील हा सामना फ्रान्ससाठी महत्त्वाचा होता. क गटातील हा पहिलाच सामना जिंकण्याचे फ्रान्सचे मनसुबे होते. युरो चषक स्पर्धेत सहा गोल करणाऱ्या ग्रीझमानच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष होते.फ्रान्सने आक्रमक खेळास सुरुवात केली. परंतु, आॅस्ट्रेलियाच्या बचावाची फळी भेदण्यात त्यांना पूर्वार्धात यश आले नाही. बेहीच, मिलिगन, सन्सबरी आणि रिसडन या बचावाच्या फळीने पूर्वार्धात आपली भूमिका चोख पार पाडली. त्यामुळे मध्यंतरापर्यंत सामना ०-० अशा बरोबरीत राहिला.उत्तरार्धात मात्र फ्रान्सने दुप्पट जोशाने आक्रमणाला सुरुवात केली आणि पेनल्टी किकच्या रूपाने फ्रान्सला गोल करण्याची संधी मिळाली. ५८ व्या मिनिटाला जोश रिश्डनने ग्रीझमानला पाडले. पंचांनी सुरुवातीला पेनल्टी नाकारली, मात्र वीएआर फुटेज पाहिल्यानंतर पेनल्टी देण्यात आली. ग्रीझमानने आॅस्ट्रेलियाचा गोलरक्षक मॅथ्यू रेयान याला चकवत गोल केला. विश्वचषक स्पर्धेत वॉर प्रणालीमुळे गोल करणारा ग्रीझमान हा पहिला खेळाडू ठरला. या गोलमुळे फ्रान्सला १-० ची आघाडी मिळाली. मात्र फ्रान्सचा हा आनंद अल्प काळच टिकला. सामन्याच्या ६२ व्या मिनिटाला आॅस्ट्रेलियाचा कर्णधार जेडीनाक याने पेनल्टीवर गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. ग्रीझमानच्या ऐवजी मैदानात उतरलेल्या आॅलिव्हर गिरोडने चांगल्या चाली रचल्या. संघ पिछाडीवर असल्याचे पाहून आॅस्ट्रेलियानेही आक्रमणाला सुरुवात केली. सामन्याच्या ८१ व्या मिनिटाला आॅलिव्हर गिरोडने दिलेल्या पासवर पॉल पोग्बाने गोल करत फ्रान्सची आघाडी २-१ अशी भक्कम केली. सामना संपेपर्यंत हीच आघाडी कायम राहिली.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Footballफुटबॉल