शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : फुटबॉलची क्रेझ राजकारणातही...सामने चुकू नये म्हणून नेत्यांनी बदलले कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2018 13:20 IST

फिफा विश्वचषकाला रशियातील लुझनिकी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. सुमारे 80 हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत लुझनिकी स्टेडियममध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन यांनी विश्वचषक स्पर्धेचे गुरुवारी उद्घाटन केले आणि त्यानंतर यजमान रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याने जागतिक महासंग्रामाला सुरुवात झाली.

ठळक मुद्देविश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी फुटबॉलप्रेमींसह अनेक राजकारणी मंडळी उत्सुकराजकीय नेत्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात केले बदल विश्वचषकासाठी 32 संघ आमनेसामने उभे ठाकणार

नवी दिल्ली : फिफा विश्वचषकाला रशियातील लुझनिकी स्टेडियममध्ये सुरुवात झाली आहे. सुमारे 80 हजार फुटबॉलप्रेमींच्या उपस्थितीत लुझनिकी स्टेडियममध्ये रशियाचे राष्ट्रपती व्लादीमिर पुतिन यांनी विश्वचषक स्पर्धेचे गुरुवारी उद्घाटन केले आणि त्यानंतर यजमान रशिया विरुद्ध सौदी अरब या सामन्याने जागतिक महासंग्रामाला सुरुवात झाली. दरम्यान, या विश्वचषकाचा आनंद लुटण्यासाठी अनेक फुटबॉलप्रेमींसह राजकारणी मंडळी उत्सुक आहेत. यासाठी राजकीय नेत्यांनी आपल्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत.

देशातील सत्ताधारी भाजपासह कॉंग्रेस, सीपीआय (एम), तृणमूल कॉंग्रेस यासह अनेक पक्षातील राजकीय व्यक्तींनी आपल्या कार्यक्रमांचे वेळापत्रक बदलले आहे. फिफा विश्वचषकातील आवडता खेळाडू आणि टीमचे सामने कधी आहेत, ते पाहून त्यानुसार आपापल्या कार्यक्रमाच्या वेळापत्रकात बदल केले आहेत. तृणमूल कॉंग्रसचे वरिष्ठ नेते आणि क्रीडामंत्री अरूप विश्वास म्हणाले की, फिफा विश्वचषकातील माझी आवडती टीम ब्राझिल आहे. त्यामुळे मी ब्राझिलचा एकही सामना चुकवू शकत नाही. त्याचबरोबर, बाकीच्या टीमचे सामने पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. 

अरुप विश्वास यांचे सहकारी आणि राज्य मंत्रिमंडळीतील नेते पार्थ चॅटर्जी यांनी सुद्धा फुटबॉलचे सामने पाहण्याचे ठरविले आहे. त्यांची सुद्धा ब्राझिल आवडती टीम आहे. यावेळी पार्थ चॅटर्जी म्हणाले की, मी ब्राझिल, अर्जेंटिना आणि जर्मनी टीमचे सामने पाहण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र, रात्री उशिरा सामने असतील, तर ते टाळण्याचा प्रयत्न करणार आहे. भाजपाचे नेते दिलीप घोष, राहुल सिन्हा यांच्यासह इतर पक्षातील नेतेमंडळी सुद्धा फिफा विश्वचषकातील सामन्यांचा आनंद लुटण्याचा प्रयत्न करणार आहे. 

दरम्यान, फिफाच्या झळाळत्या विश्वचषकासाठी 32 संघ आमनेसामने उभे ठाकणार असून विजेतेपदासाठी प्रत्येक संघ कडवा संघर्ष करताना पाहायला मिळेल. फुटबॉलच्या या महाकुंभासाठी रशिया सज्ज झाला आहे. फुटबॉलचा हा महाकुंभ याचि देही याचि डोळा पाहण्यासाठी तब्बल 10 हजार भारतीय मॉस्कोत दाखल झाले आहेत.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलPoliticsराजकारण