शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2018 : अटीतटीच्या लढतीत डेन्मॉर्कचा पेरूवर 1-0नं विजय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 23:39 IST

 फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या 7व्या सामन्यात डेन्मॉर्कच्या संघानं अटीतटीच्या लढतीत पेरूला 1-0नं हरवून शानदार विजयी आघाडी मिळवली.

सरान्स्क- फिफा वर्ल्ड कप स्पर्धेच्या 7व्या सामन्यात डेन्मॉर्कच्या संघानं अटीतटीच्या लढतीत पेरूला 1-0नं हरवून शानदार विजयी आघाडी मिळवली. युसुफ युरारे पोल्सन याने 59व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर डेन्मार्कने 36 वर्षानंतर विश्वचषकात पुनरागमन करणा-या पेरूवर 1-0 असा विजय मिळवला. पेरूच्या क्रिस्टन क्युएवाने पेनल्टीवर गोल करण्याची संधी दवडली. त्यासोबतच गोल करण्याच्या संधी गमावल्याने पेरूला पराभवाचा धक्का बसलासामन्याच्या 44व्या मिनटाला डेन्मार्कचा फॉरवर्ड युरारे याने पेरूच्या क्युएवा याला बॉक्समध्ये पाडले. त्यात व्हिडीओ सहायक रेफरीच्यामाध्यमातून त्याला पेनल्टी मिळाली. पेरुला मिळालेली ही पेनल्टी क्युएवा याने घेतली, आणि अर्जेंटिनाच्या मेस्सी पाठोपाठ दिवसभरातील दुसरी पेनल्टी वाया घालवली. क्युएवाने मारलेला शॉट क्रॉस बारच्या खुप वरून गेला. पहिला हाफ ०-० अशा बरोबरी संपला. त्यानंतर  त्यात पेरूने आठ वेळा डेन्मार्कच्या गोलपोस्टवर हल्ले केले होते. मात्र पेरूचे नशीब एकदाही फळफळले नाही. दुस-या हाफमध्ये डेन्मार्कच्या युसुफ युरारे याने 59व्या मिनिटाला ख्रिस्तियन एरिक्सनच्या पासवर पेरूच्या गोल रक्षकाला चकवत बॉल गोलपोस्टमध्ये ढकलला. आणि डेन्मार्कने 1-0अशी आघाडी घेतली. ही आघाडी अखेरपर्यंत टिकून राहिली.या सामन्यात सर्वात जास्त चर्चा राहिली ती क्युएवाने पेनल्टीची संधी दवडल्याची. आजच्या दिवसातील वाया गेलेली ही दुसरी पेनल्टी होती. या आधीच्या सामन्यात मेस्सीने आईसलॅण्ड विरोधात पेनल्टीवर गोलची संधी दवडली. 2014च्या विश्वचषकात निर्धारीत वेळेत पेनल्टीवर गोल करण्याची एकच संधी गमावली होती. तर आजच्या दिवसात दोन वेळा हा प्रकार झाला. आजच्या विजयी गोलसाठी पास दिलेला डेन्मार्कच्या ख्रिस्तियन एरिक्सन याने 14 सामन्यात डेन्मार्कसाठी 17 गोलचे योगदान दिले. त्याने या पैकी 12 गोल स्वत: केले आहेत. तर पाच गोलसाठी त्याचा पास महत्त्वाचा ठरला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८