शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 :इराणच्या हजारो महिलांनी पाहिला विश्वचषकाचा सामना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 05:28 IST

हजारो महिलांनी तेहरानमधील सर्वांत मोठ्या फुटबॉल स्टेडियममध्ये विश्वचषकाचा सामना पाहिला.

तेहरान : हजारो महिलांनी तेहरानमधील सर्वांत मोठ्या फुटबॉल स्टेडियममध्ये विश्वचषकाचा सामना पाहिला. महिलांना सामना पाहण्याची परवानगी मिळण्याची देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली. इराण विश्वचषकातून बाहेर पडला तरीही उपस्थितीमुळे महिला स्वातंत्र्याचा विजय झाला.सामन्यादरम्यान महिलांमधील उत्साह पाहण्यासारखा होता. अनेक महिलांनी गालावर राष्टÑध्वज रंगवून घेतला होता. या महिलांनी एक लाख क्षमता असलेल्या स्टेडियममध्ये लाईव्ह स्क्रीनवर सामन्याचा आनंद लुटून विश्वचषकाची रोमहर्षकता आमच्यापर्यंत पोहोचली असल्याचे संकेत दिले. इराणमधील महिलांना १९७९ च्या इस्लामिक क्रांतीनंतर खेळाचे सामने स्टेडियममध्ये पाहण्याची परवानगी नाकारण्यात आली होती.पोर्तुगालविरुद्ध इराणचा खेळाडू अखेरच्या क्षणी पेनल्टीचे गोलमध्ये रूपांतर करण्यात अपयशी ठरताच महिलांच्या उत्साहावर विरजण पडले. इराणचा स्पर्धेतील प्रवास संपुष्टात आला. आमचा संघ हरला पण या ऐतिहासिक क्षणाच्या आठवणी अनेक वर्षे ताज्या राहतील, अशी प्रतिक्रिया अनेक महिलांनी व्यक्त केली.एक महिला म्हणाली,‘आॅनलाईन तिकीट खरेदी करणे अवघडल्यासारखे वाटत होते. पण स्टेडियममध्ये प्रवेश मिळणे रोमहर्षक ठरले. उपस्थितांमधील उत्साह पाहून मी भारावलेच. माझ्या आयुष्यातील हा सर्वोत्कृष्ट प्रसंग ठरला.’इराणने पहिल्या सामन्यात मोरोक्कोवर विजय नोंदविल्यानंतर हजारो चाहत्यांनी राजधानीतील रस्त्यांवर विजयाचा जल्लोष केला. त्यानंतर स्टेडियम प्रेक्षकांसाठी उघडण्याचा निर्णय घेण्यात आला. या जल्लोषात महिलादेखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्या होत्या. (वृत्तसंस्था)