शहरं
Join us  
Trending Stories
1
भंडाऱ्याचे काँग्रेस खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; ट्रकची धडक, चौघांना किरकोळ दुखापत
2
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
3
Milk Rate: ४ रुपयांनी स्वस्त होणारे का अमूलचं दूध? कंपनीच्या एमडींनी सांगितला संपूर्ण प्लान
4
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'क्रॉस व्होटिंग'वर सर्वात मोठा दावा
5
"आता पहिल्यासारखं आयुष्य नाही..."; एकाच मुलीशी लग्न करणाऱ्या २ भावांवर कोसळला दु:खाचा डोंगर
6
नवीन गाडीची डिलिव्हरी घेताना अपघात झाला तर? महिंद्रा थारच्या घटनेतून जाणून घ्या विमा क्लेमचे नियम
7
Google Pixel 9: चक्क अर्ध्या किंमतीत खरेदी करा गुगल पिक्सेल ९; कॅमेऱ्यानं अनेकांना लावलंय वेड!
8
बहिणीच्या स्वप्नात भाऊ आला... म्हणाला, माझा खून झाला; 'ती' शंका खरी, हत्येची फिल्मी स्टोरी
9
Nepal Crisis : केपी शर्मा ओली यांचा भारताविरुद्धचा द्वेष कायम, राजीनाम्यानंतर विरोधात गरळ, आली पहिली प्रतिक्रिया
10
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
11
उघडताच पूर्ण सबस्क्राईब झाला हा IPO; आताच ११७% पोहोचला जीएमपी; १४० रुपयांचा आहे शेअर
12
दाने-दाने में केसर का दम! केसरची किंमत ५ लाख पण इथे..; शाहरूख, अजय, टायगर 'त्या' जाहिरातीमुळे अडचणीत
13
VIDEO: ट्रक पार्क केला पण हँडब्रेक लावायला विसरला, मागच्या कारच्या अंगावर गेला अन् नंतर...
14
VIRAL : 'नाही, नको,बाबा मानणार नाहीत"; ती रडत ओरडत राहिली अन् त्यानं केलं असं काही… धावत्या ट्रेनमध्ये प्रेमाचा ड्रामा!
15
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
16
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
17
कोकणची माती, 'दशावतारा'ची कला अन् गूढ रम्य कथा! सिनेमातील कलाकारांनी सांगितला अनुभव
18
पितृपंधरवड्यात भाजीपाला कडाडला; सर्व भाज्यांचे दर १०० रुपयांच्या पुढे 
19
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 

FIFA Football World Cup 2018 : ... तर सुआरेझने त्याचा चावा घेतला असता 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:40 IST

फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या सामन्यातील 63 मिनिट... मैदानात एका खेळाडूच्या मैदानात पडण्यावरून भांडण सुरु झालं, त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्ये झालं, आता मारामारीपर्यंत हे प्रकरण जाईल, असं वाटलंही होतं. त्यावेळी लुईस सुआरेझचा पारा चढला होता. त्याच्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष होतं. काहींच्या मनात अशी भिती दाटू लागली की, सुआरेझ आता फ्रान्सच्या खेळाडूचा चावा घेणार की काय... 

ठळक मुद्देपंचांनी सर्व खेळाडूंना शांत करत मॅब्प्पे आणि रॉड्रीगेज दोघांना पिवळे कार्ड दाखवले.

निझनी नोव्हगोरोड : फ्रान्स आणि उरूग्वे यांच्या सामन्यातील 63 मिनिट... मैदानात एका खेळाडूच्या मैदानात पडण्यावरून भांडण सुरु झालं, त्याचं रुपांतर बाचाबाचीमध्ये झालं, आता मारामारीपर्यंत हे प्रकरण जाईल, असं वाटलंही होतं. त्यावेळी लुईस सुआरेझचा पारा चढला होता. त्याच्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष होतं. काहींच्या मनात अशी भिती दाटू लागली की, सुआरेझ आता फ्रान्सच्या खेळाडूचा चावा घेणार की काय... फ्रान्स आणि उरूग्वे यांच्यातील उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत 63व्या मिनिटाला सामन्यात गरमागरमीचे वातावरण निर्माण झाले. दोन्ही संघातील खेळाडू अक्षरश: एकमेकांवर धावले. यात उरूग्वेच्या लुईस सुआरेझचा पारा सर्वाधिक चढलेला पाहायला मिळाला. त्यामुळे त्याच्याकडून 2014 च्या विश्वचषक स्पर्धेतील कृत्याची पुनरावृत्ती होते की काय अशी भिती निर्माण झाली होती. सामन्याच्या 61व्या मिनिटाला फ्रान्सने आणखी एक गोल करून सामन्यात 2-0 अशी आघाडी घेतली. त्यानंतर पिछाडीभरून काढण्यासाठी उरूग्वेने आक्रमणाला सुरूवात केली. 63व्या मिनि़टाला फ्रान्सचा कायलिन मॅब्प्पे आणि उरूग्वेच्या ख्रिस्टीयन रॉड्रीगेज यांच्यात चेंडूवर ताबा मिळवण्यावरून वाद झाला. त्यात मॅब्प्पे जमिनीवर कोसळला, परंतु मॅब्प्पे वेळ वाया घालवण्यासाठी हे नाटक करत असल्याचा दावा उरूग्वेकडून करण्यात आला. मॅब्प्पेला उठवण्यासाठी पुढे सरसावलेल्या रॉड्रीगेजवर फ्रान्सचे खेळाडू धावले. त्यानंतर क्षणात दोन्ही संघाचे खेळाडू एकमेकांच्या दिशेने धावले. फ्रान्सच्या पॉल पोग्बाने तर एका खेळाडूच्या मानेवर फटका मारला. सुदैवाने पंचांनी तो पाहिला नाही. या सगळ्या घडामोडीत लुईस सुआरेझ प्रचंड वैतागलेला पाहायला मिळाला. पराभवाचे मळभ डोक्यावर असताना फ्रान्सकडून खेळल्या जात असलेल्या रडीच्या डावाने त्याचा पारा चढत होता. त्यामुळे त्याच्याकडून 2014च्या विश्वचषक स्पर्धेतील चावण्याच्या त्या कृत्याची पुनरावृत्ती होते की काय अशी भिती वाटू लागली होती.पंचांनी सर्व खेळाडूंना शांत करत मॅब्प्पे आणि रॉड्रीगेज दोघांना पिवळे कार्ड दाखवले.

 

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८UruguayUruguayFootballफुटबॉलSportsक्रीडा