शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Fifa Football World Cup 2018: तीन सॉक्सची किंमत £50000; बसला ना धक्का?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 17:45 IST

रशियातील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड संघाला तीन जोडी सॉक्ससाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली आहे.  

मॉस्को - 'एक चुटकी सिंदूर की किमत तुम क्या जानोगे रमेशबाबू...' हा बॉलिवूड चित्रपटातील डायलॉग तुम्हाला माहीत आहेच. तशीच, 'तीन  जोडी सॉक्स की किमत' आम्ही तुम्हाला विचारली, तर... अर्थातच, प्रत्येकाचं उत्तर वेगळं असेल, पण तीन जोडी सॉक्स ५० हजार युरोंना पडतील, असं कुणीच सांगणार नाही. परंतु, रशियातील फिफा वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंड संघाला तीन जोडी सॉक्ससाठी एवढी मोठी रक्कम मोजावी लागली आहे.  त्याचं झालं असं की, इंग्लंडच्या डेल अली, एरीक डायर आणि रहिम स्टेर्लिंग यांनी फिफाच्या उपकरण आणि विपणन नियमांचे उल्लंघन केलं. त्यामुळे फुटबॉल असोसिएशनने त्यांना 50 हजार युरोचा दंड ठोठावला. विश्वचषक फुटबॉल स्पर्धेदरम्यान त्यांनी नायके या अधिकृत पुरस्कर्ता असलेल्या कंपनीच्या लोगोवर दुसराच सॉक्स घातला. असे करून त्यांनी फिफाच्या आचारसंहितेचा भंग केला. त्यामुळे फुटबॉल संघटनेला हे पाऊल उचलावे लागले. स्वीडनविरुद्धच्या उपांत्यपूर्व फेरीतील सामन्यात इंग्लंडच्या खेळाडूंकडून हा प्रकार घडला होता. स्वीडनविरुद्धच्या लढतीपूर्वी आणि प्रत्यक्ष सामन्यात इंग्लंडचे अनेक खेळाडू नियमांचा भंग करताना आढळले, अशी माहिती फिफाने दिली. याआधी स्वीडनच्या काही खेळाडूंना अशाच प्रकारच्या घटनेमुळे दंड भरावा लागला होता. मागील विश्वचषक स्पर्धेत चाहत्यांनी मैदानावर वस्तू फेकल्याने आणि अपशब्द वापरल्याने अर्जेंटिनाच्या संघाला 80 हजार युरोचा दंड भरावा लागला होता. 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Englandइंग्लंडFootballफुटबॉलSportsक्रीडा