शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
3
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
4
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
5
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
6
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
7
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
8
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
9
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
10
घाई करू नका! नवीन स्मार्टफोन खरेदी करण्यासाठी 'ही' आहे सर्वोत्तम वेळ; हमखास वाचतात तुमचे हजारो रुपये..
11
Secret Santa : अरे व्वा! ऑफिसमध्ये 'सीक्रेट सँटा'साठी गिफ्ट द्यायचंय? ५०० रुपयांपर्यंतचे झक्कास पर्याय
12
IPL 2026: "मला नवं आयुष्य दिल्याबद्दल धन्यवाद" पिवळी जर्सी मिळताच मुंबईच्या पोराची इमोशनल पोस्ट!
13
वंदे भारत की राजधानी, कोणत्या ट्रेनच्या लोको पायलटला सर्वाधिक पगार मिळतो? आकडा पाहून व्हाल थक्क
14
कर्जदारांना 'अच्छे दिन'! भारतीय अर्थव्यवस्था 'गोल्डीलॉक्स' स्थितीत; गव्हर्नर मल्होत्रा म्हणाले...
15
पहिल्याच बैठकीत जागावाटपावरून 'मविआ'त काडीमोड, पवारांच्या नेत्यांचा बैठकीतून वॉक आऊट
16
रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! वेटिंग-RAC तिकिटाची स्थिती आता १० तास आधी कळणार
17
काँग्रेसची कार्यकर्ती, वरपर्यंत ओळख असल्याचं सांगून आणायची प्रेमासाठी दबाव, त्रस्त पोलीस इन्स्पेक्टरची महिलेविरोधात तक्रार
18
मुंबई इंडियन्सची 'ती गोष्ट 'जितेंद्र भाटवडेकर'च्या मनाला लागली? रोहितसोबतचा फोटो शेअर करत म्हणाला...
19
‘टॅरिफला आता हत्यार बनवले जातेय’, निर्मला सीतारमण यांनी सांगितला 'ट्रम्प टॅरिफ'मागील खेळ...
20
ICICI Prudential AMC IPO Allotment: कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस? जीएमपीमध्येही जोरदार तेजी
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : जर्मनीचा स्वीडनवर 2-1 विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2018 04:06 IST

जर्मनीचा स्वीडनवर 2-1 विजय

सोची :  फिफा विश्वचषकात ग्रुप एफमधील आज झालेल्या साखळी सामन्यात गत विजेत्या जर्मनीने स्वीडनचा 2-1 अशा फरकाने पराभव केला. स्वीडनकडून ओला टोइवोनेनने 32 व्या मिनीटाला गोल करत आघाडी घेतली होती. पण जर्मनीने आपला खेळ उंचावत स्वीडनच्या  आशेवर पाणी फेरले. चार वेळा फिफा विश्वचषकावर नाव कोरणाऱ्या जर्मनीकडून मार्को रेयूसने 48 व्या आणि टोनी क्रुसने 90 + 4.42 व्या मिनीटाला गोल केला.  या विजयासह जर्मनीच्या राऊंड 16 मध्ये पोहचण्याच्या आशा कायम राहिल्या आहेत. 

शनिवारी झालेल्या तिसऱ्या सामन्यातील पहिल्या हाफमध्ये स्वीडनने आक्रमक खेळ करत गतविजेत्या जर्मनीवर आघाडी घेतली होती. आघाडी फळीचा खेळाडू ओला टोईवोनेनने ३२व्या मिनिटाला केलेल्या अफलातून गोलच्या जोरावर स्वीडनने जर्मनीविरुद्ध मध्यंतरापर्यंत १-० गोलने आघाडी घेतली होती. सुरुवातीपासूनच दोन्ही संघांनी आक्रमक खेळ करण्यास सुरुवात केली. पण दोन्ही संघांच्या बचावफळ्या भक्कम असल्यामुळे कोणताही संघ गोल करू शकला नाही. ३२व्या मिनिटाला स्वीडनच्या ओला टोईवोनेने केलेल्या एका चालीवर त्याला सुवर्णसंधी मिळाली. दोन्ही खेळाडूंना चकवत त्याने चेंडू गोलजवळ नेला. तो जवळ आलेला पाहून जर्मनीचा खेळाडू चार पावले पुढे आला. त्याचा फायदा घेऊन ओला टोईवोनेनने चेंडू जर्मनीच्या गोलरक्षकाच्या डोक्यावरून अलगद गोलपोस्टमध्ये टाकून आपल्या संघाला १ गोलची आघाडी मिळवून दिली. पण दुसऱ्या हाफमध्ये गतविजेत्या जर्मनीने आपला खेळ उंचावला. सामन्यात शानदार पुनरागमन करत गतविजेत्या जर्मनीने 1-2ने विजय मिळवत राऊंड -16 मध्ये राहण्याच्या आशा जिवंत ठेवल्या. 

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Germanyजर्मनी