मुंबई : फिफा वर्ल्ड कप 1986 मध्ये दिएगो मॅरोडोनाने ज्याप्रकारे आपल्या दमदार खेळाने अर्जेंटिनाला चॅम्पियन बलवले होते त्याचं उदाहरण आजही दिलं जातं. फुटबॉलच्या इतिहासात गणल्या जाणाऱ्या मॅरोडोनाने या त्या वर्ल्ड कपमध्ये असा काही खेळ केला होता की, या खेळाने तो महान खेळाडू ठरला. खासकरुन 1986 च्या वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये इंग्लंड विरुद्ध केलेले त्याचे गोल नेहमी फुटबॉल प्रेमींच्या स्मरणार राहतील.
22 जून 1986 फिफा वर्ल्ड कपच्या क्वार्टर फायनलमध्ये अर्जेंटिना आणि इंग्लंडमध्ये सामना झाला होता. त्यावेळी दोन्ही देशांमध्ये फार तणाव होता. पण त्यावेळी मॅरोडोनाने आपल्या दमदार खेळाने इंग्लंडच्या स्वप्नांवर पाणी फेरले. केळ सुरु झाल्यावर 51 व्या मिनिटात मॅरोडोनाने गोल केला.
मॅरोडोनाच्या दमदार खेळाच्या जोरावर अर्जेंटिनाने इंग्लंडला 2-1 ने मात देत सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळवला होता. आणि याच वर्ल्ड कपमध्ये अर्जेंटिना जर्मनीला मात देत वर्ल्ड चॅम्पियन बनला होता.