शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

FIFA Football World Cup 2018 : बेल्जियमपुढे जपानचे कडवे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 02:55 IST

फिफा विश्वकप स्पर्धेत बेल्जियम संघाला सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ड्राइस मर्टेन्सने आपल्या संघाला जपानला कमी लेखण्याची चूक न करण्याचा सल्ला दिला आहे.

रोस्तोव-आॅन-दोन : फिफा विश्वकप स्पर्धेत बेल्जियम संघाला सोमवारी उपउपांत्यपूर्व फेरीत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. ड्राइस मर्टेन्सने आपल्या संघाला जपानला कमी लेखण्याची चूक न करण्याचा सल्ला दिला आहे.बेल्जियम संघ विश्वकप स्पर्धेत ‘छुपा रुस्तम’ ठरला असून हा संघ बाद फेरीत आगेकूच करण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. त्यांनी अखेरच्या साखळी लढतीत इंग्लंडचा १-० ने पराभव करीत ‘जी’ गटात अव्वल स्थान पटकावले. बेल्जियमला अंतिम १६ च्या लढतीत जपानच्या आव्हानाला सामोरे जावे लागेल. दरम्यान, मर्टेन्सने संघाला २०१६ च्या युरो स्पर्धेतील उपांत्यपूर्व फेरीची पुनरावृत्ती टाळण्याचा सल्ला दिला आहे. त्यावेळी बेल्जियम संघ प्रबळ दावेदार असताना वेल्सविरुद्ध १-३ ने पराभूत झाला होता.मर्टेन्स म्हणाला, ‘आम्ही जपानला कमी लेखण्याची चूक करणार नाही. कारण त्यांचा संघ मजबूत आहे. जर त्यांनी साखळी फेरीचा अडथळा पार केला आहे म्हणजे त्यांचा संघ नक्कीच तुल्यबळ आहे.’आतापर्यंत नऊ गोल नोंदविणारा बेल्जियम संघ स्पर्धेत सर्वाधिक गोल नोंदविणारा संघ आहे. स्ट्रायकर रोमेलू लुकाकूने साखळी फेरीत ट्युनिशिया व पनाविरुद्ध प्रत्येकी दोन गोल नोंदवले आहेत. टाचेच्या दुखापतीमुळे गेल्या लढतीत खेळू न शकलेला लुकाकू जपानच्या आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज आहे.मार्टिनेजचे सर्व खेळाडू फिट असून बेल्जियम संघ आपल्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीमध्ये सुधारणा करण्यात यशस्वी ठरेल, अशी आशा आहे. संघाने ३२ वर्षांपूर्वी मॅक्सिकोमध्ये १९८६ मध्ये झालेल्या स्पर्धेत उपांत्य फेरी गाठली होती.जपान प्रथमच उपांत्यपूर्व फेरी गाठत इतिहास नोंदविण्यास प्रयत्नशील आहे. जपानने यापूर्वी २००२ व २०१० मध्ये उपउपांत्यपूर्व फेरी गाठली होती, पण दोन्हीवेळा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. जपानला अखेरच्या साखळी लढतीत पोलंडविरुद्ध ०-१ ने पराभव स्वीकारावा लागला होता, पण सेनेगलच्या तुलनेत पिवळे कार्ड कमी मिळल्याने त्यांना बाद फेरीत प्रवेश करता आला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८