शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

FIFA FOOTBALL World Cup 2018: क्रोएशियाचा अर्जेंटिनावर 3-0नं विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2018 01:42 IST

फिफा विश्वचषकाच्या 23व्या सामन्यात क्रोएशियानं अर्जेंटिनावर 3-0नं विजय मिळवला आहे.

नाझनी नोवगोरोद : अँटे रेबिक कर्णधार लुका मॉड्रिक आणि इवान रॅकितिक यांनी नोंदवलेल्या शानदार गोलच्या जोरावर क्रोएशियाने यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत खळबळजनक निकाल नोंदवताना बलाढ्य अर्जेंटिनाला ३-० असे नमविले. या अनपेक्षित पराभवासह जेतेपदाचे प्रबळ दावेदार असलेल्या अर्जेंटिनाच्या बाद फेरीच्या आशा खूप धुसर झाल्या आहेत.निझनी नोवगोरोद स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अर्जेंटिनाला क्रोएशियाच्या तुफानी वादळाला सामोरे जावे लागले. अत्यंत महत्त्वाच्या बनलेल्या या सामन्यात अर्जेंटिनाची बचावफळी सपशेल अपयशी ठरली. सामन्याचे पहिले सत्र गोलशून्य बरोबरीत सुटल्यानंतर दुसऱ्या सत्रात क्रोएशियाने तुफानी खेळ करताना तब्बल तीन गोलचा धडाका केला. ५३व्या मिनिटाला रेबिकने वेगवान गोल करताना क्रोएशियाला आश्चर्यकारक १-० अशी आघाडी मिळवून दिली. या पहिल्या गोलनंतर अर्जेंटिनाचा संघ प्रचंड दबावाखाली आला आणि हा दबाव त्यांच्या धसमुसळ्या खेळातून स्पष्ट दिसून आला. अर्जेटिनाच्या आक्रमकतेला क्रोएशियानेही त्याच आक्रमकतेने उत्तर दिल्याने दोन्ही संघांना प्रत्येकी ३ पिवळ्या काडर््सला सामोरे जावे लागले. कमजोर बचवाफळीचा फायदा घेत मॉड्रिकने ८०व्या मिनिटाला गोल केल्यानंतर भरपाई वेळेत रॅकितिक यानेही गोल करत क्रिएशियाचा दणदणीत विजय निश्चित केला.या सामन्यात सुपरस्टार लिओनेल मेस्सीची काहीच जादू चालली नाही. क्रोएशियाच्या भक्कम बचावफळीने मेस्सीला रोखताना अर्जेटिनाचे मानसिक खच्चीकरण केले. या पराभवानंतर अर्जेटिनाला बाद फेरी गाठण्यासाठी आपल्या अखेरच्या सामन्यात नायजेरियाला मोठ्या फरकाने पराभूत करणे आवश्यक आहे. त्याचवेळी, नायजेरीचा आईसलँडविरुद्धचा विजयही अर्जेंटिनासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच, या शानदार विजयासह क्रोएशियाने यंदाच्या विश्वचषकात बाद फेरी गाठणारा चौथा संघ म्हणून मान मिळवला.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिनाSportsक्रीडाCroatiaक्रोएशिया