शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
2
'सेव्हन सिस्टर्स' तोडण्याची धमकी खरी होणार; शेख हसीनांच्या मुलाने भारताला केले अलर्ट
3
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
4
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
5
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
6
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
7
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
8
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
9
चाराण्याचीही किंमत नाही...! तरी २०२५ मध्ये छापलेले, १ सेंटचे नाणे १५० कोटींना विकले गेले...; अमेरिकेचे असले म्हणून काय झाले...
10
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
11
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
12
शहीद पित्याचं पार्थिव पाहून चिमुकलीची 'पापा- पापा' हाक; पाषाणालाही पाझर फुटेल असा तो क्षण!
13
"गरज संपली की लाथ, गरज असेल तेव्हा मिठी...",भाजपाचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
14
फोर्डचा मोठा निर्णय! LG सोबतचा ५८,७३० कोटींचा बॅटरी करार रद्द; डोनाल्ड ट्रम्प ठरले व्हिलन...
15
"स्वतःला म्हणवतो आशिष कुरेशी, पण ही आहे मुंबईला..."; शेलारांनी डिवचलं, मनसे नेत्याने सुनावलं; नेमकं काय घडलं?
16
पट्ट्याने मारहाण, तोंड दाबलं; ईश्वरपुरात आठवीतील मुलीवर ओळखीतल्याच दोघांकडून बलात्कार, विवस्त्र अवस्थेतच आली चालत
17
Stock Market Today: शेअर बाजाराची कमकुवत सुरुवात; सेन्सेक्स १५० अंकांनी घसरला, IT, PSU Bank मध्ये तेजी
18
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
19
Big Banks Rate Cut: नव्या वर्षाच्या आधीच खूशखबर! SBI, PNB सह 'या' ८ बँकांनी स्वस्त केले व्याजदर, किती कमी होणार EMI?
20
२ कोटींपर्यंत दंड अन् बंद होणार विद्यापीठ?; केंद्र सरकार करणार उच्च शिक्षण क्षेत्रात मोठा बदल
Daily Top 2Weekly Top 5

Euro 2020 Final, ENG vs ITA : इटलीनं 53 वर्षांनंतर पटकावलं यूरो जेतेपद; इंग्लंडचे घरच्या मैदानावर शूट आऊट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 03:52 IST

इटलीनं 1968मध्ये यूरो चषक जिंकला होता आणि त्यानंतर 2000 व 2012मध्ये त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. Italy win 3-2 on penalties after 1-1 vs England in regulation time

Euro 2020 Final, England vs Italy : यूरो स्पर्धेच्या फायनलच्या इतिहासात सर्वात वेगवान गोलचा विक्रम इंग्लंड विरुद्ध इटली यांच्यातल्या सामन्यात नोंदवला गेला. इंग्लंडनं 1.57 मिनिटालाच गोल खाते उघडले, परंतु आतापर्यंत बलाढ्य प्रतिस्पर्धींना कडवी मात देऊन अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या इटलीनं दुसऱ्या हाफमध्ये बरोबरीचा गोल करून इंग्लंड समर्थकांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडवला. दुसऱ्या मिनिटाला मिळालेल्या आघाडीनंतर निर्धास्त झालेल्या थ्री लायन्सला अतिबचावात्मकता महागात पडली. इटलीनं संयमी खेळ करताना चेंडूवर अधिककाळ ताबा ठेवत 90 मिनिटांच्या आणि त्यानंतर अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळात सामना 1-1 असा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवले. उपांत्य फेरीत पेनल्टी शूटआऊटमध्ये इटलीनं माजी विजेत्या स्पेनचे आव्हान संपुष्टात आणले होते. त्यामुळे इंग्लंडच्या चाहत्यांना पेनल्टी शूटआऊटचा थरार नको होता. याही सामन्यात इटलीनं बाजी मारली आणि विम्बल्डी स्टेडियमवर स्मशानशांतता पसरली.  I̶t̶'̶s̶ ̶c̶o̶m̶i̶n̶g̶ ̶H̶O̶M̶E̶  It's gone to Rome!. हे एका चाहत्यानं काही दिवसांपूर्वी झळकवलेलं फलक खरं ठरलं. इटलीनं 1-1 (3-2) असा विजय मिळवला. Italy win 3-2 on penalties after 1-1 vs England in regulation time

यूरो स्पर्धा इतिहासात फायनलमधील सर्वात जलद गोल...इंग्लंडने 55 वर्षांचा जेतेपदाचा दुष्काळ संपवण्याच्या दिशेने दमदार सुरूवात केली. दुसऱ्याच मिनिटाला इटलीच्या बचावफळीत झालेल्या चूकीचा फायदा उचलला. के ट्रीपीयरने पेनल्टी बॉक्स बाहेरून दिलेल्या पासवर ल्यूक शॉ याने सुरेख गोल केला. दुसऱ्याच (१.५७ मि.)  मिनीटाला इंग्लंडने  १-० अशी आघाडी घेतली. यूरो फायनलमधील हा सर्वात जलद गोल ठरला. ( 1:57 - Luke Shaw's opener was the quickest ever goal scored in the final of the European Championships, as well as his first ever for the England national team.) इथेच इटलीचे खेळाडू खचले. इंग्लंडने त्यानंतर आणखी आक्रमक खेळ करून इटलीवर दडपण टाकण्याचा प्रयत्न केले. पहिल्या हाफमध्ये ४ मिनिटांचा भरपाई वेळ जोडण्यात आला आणि त्यात बरोबरी मिळवण्याच्या जवळ इटली पोहोचलाच होता, परंतु जॉन स्टोन याने त्यांचा प्रयत्न हाणून पाडला. पहिल्या ४५+४ मिनिटांच्या खेळात इटलीकडे सर्वाधिक वेळ चेंडूचा ताबा होता, परंतु त्याचा फायदा करून घेण्यात ते अपयशी ठरले. 

इटलीचा लिओनोर्डो बोनसी ठरला सर्वात वयस्कर गोल स्कोरर...दुसऱ्या हाफच्या चौथ्या मिनिटाला मिळालेल्या फ्री किकवर पेनल्टी वर्तूळावरुन इटलीला बरोबरीचा गोल करण्यात पुन्हा अपयश आले. लोरेजो इन्सिग्ने याने ही संधी गमावली. इंग्लंडचा संघ बचावात्मक मोड मध्ये होता. त्यांच्या बचावपटूूनी सुरेख कामगिरी बजावली. सामना पुढे सरकत असताना इटलीच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावरील निराशा आणखी वाढत होती. पण ६७व्या मिनिटाला हे नैराश्य नाहीशे झाले. लिओनार्डो बोनसीने इटालीला १-१ अशी बरोबरी मिळवून दिली. या गोलनंतर लंडनमधील विम्बली स्टेडियमवर सन्नाटा पसरला. आतापर्यंत विजयाच्या नशेत नाचणारे इंग्लंड समर्थक गपगार झाले. यूरो स्पर्धेच्या फायनलमध्ये गोल करणारा बोनसी हा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला. 34 वर्ष व 71 दिवसांच्या बोनसीनं गोल करून  1976साली बेर्न्ड होलझेमबेन यांचा ( 30 वर्ष व 103 दिवस) विक्रम मोडला. ( Leonardo Bonucci (34 years and 71 days) has become the oldest scorer in a EURO final, beating the previous record of Bernd Hölzenbein in 1976 (30 years and 103 days)) 

या गोलनं इटलीच्या ताफ्यात जणू प्राण ओतले अन् त्यांचा आक्रमक खेळ सुरू झाला. इंग्लंडलाही बचावात्मक खेळ करण्याची रणनीती सोडून आक्रमणाची कास धरावी लागली. पण इटलीनं छोटे छोटे पास करत खेळ केला अन् 90 + 6 मिनिटांच्या भरपाई वेळेतही बरोबरीची कोंडी फुटली नाही. अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळातील सहाव्या मिनिटाला रहिम स्टेर्लिंगचा गोल करण्याचा प्रयत्न इटलीचा कर्णधार जिऑर्जीओ चिएलीनीनं अपयशी ठरवला. गोलजाळीनजीक आलेल्या स्टेर्लिंगनं मारलेला चेंडू चिएलीनीनं अडवला. इटलीही आघाडी घेण्याच्या अगदी नजीक आली होती, परंतु त्यांच्याही वाट्याला निराशा आली. इटलीच्या या कमबॅकनं इंग्लंडच्या चाहत्यांना मात्र तणावात ढकलले होते. अतिरिक्त 30 मिनिटांच्या खेळातही 1-1 अशी बरोबरी कायम राहिली. 

पेनल्टी शूटआऊटचा थरारइटली - डी बेराडीनं ( गोल), ए बेलोट्टी ( संधी गमावली), लिओनार्डो बोनसी ( गोल), एफ बेर्नाडेसी ( गोल), इंग्लंड - हेरी केन, एच मार्गुरे, रशफोर्ड ( संधी गमावली, चेंडू गोलजाळीला लागून माघारी), सांचो ( संधी गमावली), बी साका ( संधी गमावली)  

टॅग्स :ItalyइटलीEnglandइंग्लंड