शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2022 : इंग्लंडचा फॅन बिअरच्या शोधात पोहोचला 'शेख'च्या घरात, त्याने दाखवले वाघ, सिंह अन्... Video 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 11:36 IST

FIFA World Cup 2022 : इंग्लंडच्या फुटबॉल संघाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विक्रमी विजय मिळवला.

FIFA World Cup 2022 : इंग्लंडच्या फुटबॉल संघाने फिफा फुटबॉल वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात विक्रमी विजय मिळवला.१९६६ सालच्या वर्ल्ड कप विजेत्या इंग्लंडने युवा ब्रिगेडच्या उल्लेखनीय खेळाच्या जोरावर आशियाई चॅम्पियन इराणवर ६-२ असा विजय मिळवला. ज्यूड बेलिंगहॅम, बुकायो साका ( दोन गोल), रहिम स्टर्लिंग,  जॅक ग्रेलिश व मार्कस रॅशफोर्ड या इंग्लंडच्या फ्युचर स्टार्सनी गोल केले. इराणकडून मेहदी तरेमीने दोन गोल केले. पण, मैदानावर हा सामना सुरू होण्यापूर्वी मैदानाबाहेर वेगळाच प्रकार घडला. कतारच्या नियमानुसार येथे बिअरवर बंदी आहे आणि त्यामुळे फुटबॉल फॅन्स नाराज आहेत. तरीही कुठे बिअर मिळतेय का, यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे. बिअरच्या शोधात इंग्लंडचे काही फॅन्स शेख पॅलेसपर्यंत पोहोचले आणि त्यानंतर जे घडले, हे त्यांनी व्हिडीओ पोस्ट करून सांगितले.

आधी कचाकचा भांडले अन् मग जे घडलं ते सारेच पाहत बसले, कतार-इक्वेडोर लढतीत 'अजब' सामना

कालच्या सामन्यात ज्यूड बेलिंगहॅम हा इंग्लंडकडून वर्ल्ड कपमध्ये गोल करणारा दुसरा युवा खेळाडू ठरला. यापूर्वी ओवेनने १९९८मध्ये १९ वर्ष व १९० दिवसांचा असताना गोल केला होता. बुकायो साका ( २१ वर्ष व ७७ दिवस) याने वर्ल्ड कप स्पर्धेच्या त्याच्या पहिल्याच सामन्यात २+ गोल केले. १९६६ साली फ्रान्झ बेकनबोएर ( २० वर्ष व ३०४ दिवस) यांच्यानंतर साका हा दुसरा युवा खेळाडू ठरला.  बदली खेळाडू म्हणून आलेल्या मार्कस रॅशफोर्डने आज ४९ सेकंदात गोल केला आणि वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात इंग्लंडसाठी बदली खेळाडूने केलेला हा तिसरा जलद गोल ठरला. या सामन्यापूर्वी इंग्लंडचे चाहते बिअरच्या शोधात शेख पॅलेसपर्यंत पोहोचले.

त्या संदर्भातला व्हिडीओ सध्या सोशल मीडिया  व्हायरल झाला आहे. माजीद फ्रीमन याने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे आणि त्यात त्याने लिहिले की, इंग्लंडचे दोन चाहते बिअरच्या शोधात होते आणि ती शोधता शोधता शेख पॅलेसमध्ये पोहोचले. या व्हिडीओतील इंग्लंडचा फॅन सांगत होता की, काल रात्री आमची शेखच्या मुलाशी भेट झाली आणि त्याने आम्हाला पॅलेसच्या मागच्या बाजूला नेले. तेथे सिंह आणि सर्वकाही होतं. त्यांनी आमचं आदरातिथ्य केले. आम्ही बिअरच्या शोधात होतो आणि त्यांनी आमच्यासाठी व्यवस्था केली. लँड क्रुझरमध्ये गेलो आणि पूर्ण पॅलेस पाहिले. त्यांनी आम्हाला माकडं, विविध पक्षी दाखवले.'' 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२Englandइंग्लंडQatarकतार