शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
2
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
3
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
4
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
5
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
6
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
7
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल
8
आई-वडिलांस पोटगी देण्यास नकार; मुलाची तुरुंगात रवानगी!
9
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
10
IND vs ENG : "त्यांनी जे केलं ते समजण्यापलिकडचं" पिच क्युरेटरसोबतच्या वादावर काय म्हणाला गिल?
11
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
12
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
13
सर्वसामान्यांच्या 'लालपरी'ला येणार अच्छे दिन, एसटी महामंडळाचे वर्षाला १२ कोटी रुपये वाचणार!
14
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
15
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
16
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
17
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
18
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
19
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
20
भिवंडी वाडा रस्त्यावर खड्ड्याने घेतला युवकाचा बळी; संतप्त ग्रामस्थांचा रुग्णवाहिका रस्त्यावर ठेवत रास्तारोको

क्रोएशियाने केली इंग्लिश सिंहाची शिकार!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2018 05:24 IST

क्रोएशियाने विनाकारण गुरगुरणाऱ्या इंग्लिश सिंहाची शिकारच केली एकदाची!

 - रणजीत दळवीक्रोएशियाने विनाकारण गुरगुरणाऱ्या इंग्लिश सिंहाची शिकारच केली एकदाची! त्यांनी ट्युनिशिया आणि पनामासारख्या लहान-सहान शिकारी करत आपली हवा निर्माण केली; पण कोलंबियाशी लढताना त्यांचीच शिकार होता होता टळली. स्वीडनवर सेट-पीसच्या गोलवर विजय मिळविताना मोठी शिकार करण्याची त्यांची क्षमता नाही हे उघड झाले. क्रिएरन ट्रिपिअरने केलेल्या गोलवर मिळवलेली आघाडी टिकविण्यात अपयश आलेल्या इंग्लडला क्रोएशियालाही फाडून खाता आले नाही! दात नसलेल्या सिंहासारखी त्यांची अवस्था होती.इव्हान पेरिसिच क्रोएशियाचा हिरो ठरला! त्याची वेगवान आक्रमणे व संधिसाधूपणामुळे संघाचे मनोबल उंचावले. ६५ व्या मिनिटाला सिमे व्रयालोकाच्या उंच क्रॉसवरील चेंडूला पाय उंचावत त्याने गोल दिशा दिली, हा संधी साधण्याचा सर्वोत्तम नमुना होता. इंग्लडचा काइल वॉकर चेंडू हेड करण्याच्या बेतात असता इव्हानने ‘हाय-बूट’ वापरून चेंडू चक्क ‘पोक’ केला. कदाचित त्याने धोकादायक खेळ केला अशी शंका निर्माण झाली; पण इंग्लंडकडून कोणतीच तक्रार न झाल्याने गोलनिर्णय योग्य ठरला. या गोलने सामन्याचे रूप बदलले.इंग्लंडला खरे तर स्वप्नवत सुरुवात लाभली. प्रतिस्पर्धी कर्णधार ल्युका मॉड्रिचने त्यांना जे हवे ते दिले. त्याने डेली अलीला पेनल्टी क्षेत्राच्या बाहेर अवैधरीत्या रोखले. क्रिएरन ट्रिपिअरने ही सुवर्णसंधी साधली. त्याची फ्री-किक एकदम अचूक! इंग्लिश चाहत्यांना डेव्हिड बेकहमची आठवण त्याने करून दिली. सुुबासिच काय, कोणत्याही गोलरक्षकाला तो अडविता आला नसता. ज्याचे ‘हरीकेन’ म्हणजे वादळ अशी तुलना झाली त्या इंग्लिश कर्णधार हॅरी केनने दोन सोप्या संधी दवडल्याने त्यांची स्थिती भक्कम झाली नाही. केनने सुबासिचला अंशत: चकविले; पण चेंडू खांबावर आदळला. त्या रिबाउंडवरही त्याला गोल करता आला नाही. तेव्हाच केन ‘आॅफ-साइड’ असल्याचा निर्णय दिला. म्हणून त्याचे पहिल्या प्रयत्नावेळचे अपयश थोडेच झाकले जाणार? ‘गोल्डन बूट’ शर्यतीत अव्वल असलेले हे ‘वादळ’ म्हणजे वाºयाच्या साध्या झोताएवढ्या जोराचेही दिसले नाही. सहापैकी ३ गोल पेनल्टीचे, गेल्या तीन लढतींत त्याचा काहीच प्रभावी खेळ नाही.रहीम स्टर्लिंग, जेस्सी लिनगार्ड व डेले अली यांचाही बुडबुडा फुटला! एक गोल प्रयत्न सोडा, समन्वय साधत एकही चाल त्यांना रचता आली नाही. मॉडरिच सुरुवातीला निष्प्रभ ठरल्याने क्रोएशियाच्या वाट्याला पूर्वाधात दोनच संधी आल्या. प्रथम रेबिचचा ताकदवान फटका इंग्लिश गोलरक्षक जॉर्डन पिकफर्डच्या हातात विसावला. त्यानंतर पेरिसिचने चेंडू लाथाडायला फारच वेळ घेतला. मात्र, पेरिसिच उत्तरार्धात वेगळाच वाटला. त्याचा एक जोरदार लेफ्ट- फूटर दूरच्या गोलखांबावर थडकला. रेबिचने ‘रिबाऊंड’ कमजोरपणे मारला व पिकफर्डने सुटकेचा श्वास सोडला.शेवटी जादा वेळेत व्रयालको क्रोएशियाचा तारणहार ठरला. जॉन स्टोन्स्चा कॉर्नरवरील हेडर व्रयालकोने गोलरेषेवरून डोक्यानेच परतविला. विजयी गोल करण्यापूर्वी मॅँडझुकीच पेनल्टी क्षेत्रात घुसला; पण पिकफर्ड मोठ्या हिमतीने पुढे सरसावत त्याला सामोरा गेला. चेंडू त्याच्या पायाला लागला व गोल वाचविला. इंग्लंडच्या ११० व्या मिनिटातल्या घोडचुकीचा अचूक लाभ पेरिसिचने उठविला. त्याचा अचूक पास मॅँडझुकीचला मिळाला. त्याला अडविण्यासाठी ना मॅग्वायर ना स्टोन्स पुढे झाले. बिचारा पिकफर्ड, चेंडू त्याच्या खालून गोलमध्ये गेला. यानंतर मॅँडझुकीचने लंगडत मैदान सोडले. इंग्लंडनेही ट्रिपिअर दुखापतग्रस्त होताच, दहा खेळाडूंसह लंगडत सामना पूर्ण केला!

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Englandइंग्लंड