शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
2
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
3
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
4
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
5
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
6
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
7
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
8
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
9
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
10
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
11
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
12
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
13
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
14
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
15
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
16
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
17
दररोज अंगाला साबण लावत असाल तर आताच बदला सवय; कधी, किती वेळा करायचा वापर?
18
इस्राइलच्या हल्ल्यात स्टार फुटबॉलपटूचा मृत्यू, या देशाचा ‘पेले’ अशी होती ओळख 
19
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
20
सॅमसंग गॅलेक्सी एस २४ अल्ट्रा ५० हजारांनी स्वस्त, कॅमेरा क्वालिटीत कुठलंही कॉम्प्रमाइज नाही!

रोनाल्डोची जिगरबाज हॅटट्रिक! पोर्तुगाल-स्पेनमधील रंगतदार लढत बरोबरीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2018 01:49 IST

ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक आणि डिएगो कोस्टासह इतर स्पॅनिश खेळाडूंनी केलेला सांघिक खेळ यामुळे ब गटात पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात  शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली लढत 3-3 अशा बरोबरीत सुटली. 

सोची - फिफा विश्वचषक स्पर्धेमध्ये आज फुटबॉलप्रेमींना अत्यंत अटीतटीच्या लढतीची मेजवानी मिळाली. ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक आणि डिएगो कोस्टासह इतर स्पॅनिश खेळाडूंनी केलेला सांघिक खेळ यामुळे ब गटात पोर्तुगाल आणि स्पेन यांच्यात  शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेली लढत 3-3 अशा बरोबरीत सुटली. ख्रिस्टियानो रोनाल्डोने केलेली जिगरबाज हॅटट्रिक या लढतीत निर्णायक ठरली.गेल्या तीन विश्वचषकात म्हणावा तसा प्रभाव पाडू न शकणाऱ्या रोनाल्डोने आज स्पेनविरुद्ध जबरदस्त खेळाचे प्रदर्शन केले. त्याच्या जादुई खेळाच्या जोरावर पोर्तुगालने लढतीतील बहुतांश काळ वर्चस्व राखले. अखेरीस पोर्तुगाल पराभवाच्या छायेत असताना रोनाल्डोने 89 व्या मिनिटाला केलेला तिसरा गोल निर्णायक ठरला. रोनाल्डोच्या या गोलच्या जोरावर पोर्तुगालने पराभव टाळत लढत बरोबरीत सोडवली. रोनाल्डोने केलेली हॅटट्रिक ही या विश्वचषकातील पहिली हॅटट्रिक ठरली. अटीतटीच्या झालेल्या या लढतीत दोन्ही संघांमध्ये सुरुवातीपासूनच काँटेकी लढत पाहायला मिळाली. सामन्याच्या चौथ्या मिनिटालाच ख्रिस्टियाने रोनाल्डोने गोल करून पोर्तुगालला आघाडी मिळवून दिली. लढतीवर पोर्तुगालचे वर्चस्व दिसत असतानाच डिओगो कोस्टाने 24 व्या मिनिटाला गोल करून स्पोनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर स्पेनने पोर्तुगालवर हुकूमत राखली. पण मध्यंतराला काही अवधी असतानाच रोनाल्डोने दुसरा गोल करून पोर्तुगालला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरानंतर स्पेनने आक्रमणाची धार वाढवली. 55 व्या मिनिटाला डिएगो कोस्टाने गोल करून स्पोनला बरोबरी साधून दिली. त्यानंतर निको याने 58 व्या मिनिटाला गोल करून स्पेनला 3-2 अशी आघाडी मिळवून दिली. छोटे छोटे पास देत स्पॉनिश खेळाडूंनी केलेल्या आक्रमणामुळे पोर्तुगालची बचावफळी खिळखिळी झाली. मात्र 89 व्या मिनिटाला बचावफळीतील खेळाडींनी केलेली क्षुल्लक चूक स्पेनला नडली. मग मिळालेल्या फ्री किकचा पुरेपूर फायदा उठवत ख्रिस्टियाने रोनाल्डोने सामन्यातील आपला तिसरा गोल नोंदवतानाच पोर्तुगालला बरोबरीत आणले. अखेर ही लढत 3-3 अशा बरोबरीत सुटली.  

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा