शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत अग्नितांडव; कफ परेड आगीत एका मुलाचा मृत्यू, तीन जण रुग्णालयात; एकाची प्रकृती चिंताजनक
2
"भारताने इस्रायलकडून शिकायला हवे", RSS नेते भैयाजी जोशी नेमकं काय म्हणाले? धर्मांतरणावरही स्पष्टच बोलले!
3
गेल्या महिन्यातच लाँच केलेली...! मारुतीने विक्टोरिसची किंमत वाढविली, पहा नेमकी किती...
4
कतारने मोठी चूक केली...! तालिबानने युद्धविरामातील एका शब्दावर तीव्र आक्षेप घेतला, निवेदन बदलण्याची वेळ आली...
5
विकली जाणार देशातील 'ही' दिग्गज खासगी बँक; ₹२६,८५० कोटींची डील, UAE च्या या कंपनीच्या हाती येणार सूत्रं
6
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्र्म्प आणि युक्रेनच्या झेलेन्स्कींचे पुन्हा जोरदार भांडण; नकाशा बाजुला फेकला... 
7
हाँगकाँगमध्ये UAE चे कार्गो प्लेन रनवेवरून समुद्रात घसरले; विमानातील कर्मचारी वाचले, पण दोन ग्राउंड स्टाफचा मृत्यू
8
"जेव्हा हिचे हिरोईन म्हणून करिअर चालले नाही, तेव्हा...", राखी सावंतचा तमन्ना भाटियावर हल्लाबोल, म्हणाली - "लाज बाळग..."
9
दिवाळी सुरु नाही झाली तोच दिल्लीची हवा अतिविषारी बनली; आनंद विहारमध्ये गुणवत्ता ४१७ वर...
10
'त्या' तरूणाचा प्रायव्हेट पार्ट कुणी कापला? अखेर उलगडा झाला! समोर आलं धक्कादायक सत्य
11
ट्रम्पविरोधात अमेरिकन पेटून उठले, ‘नो किंग्ज’ म्हणत रस्त्यावर उतरले! सरकारी हुकुमशाहीचा विरोध
12
आजचे राशीभविष्य : सोमवार २० ऑक्टोबर २०२५; आजचा दिवस व्यापार-व्यवसायासाठी लाभदायी, जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठीही अनुकूल
13
महाराष्ट्राला केंद्राकडून १,५६६ कोटी मदत; अमित शाह यांची घोषणा, CM फडणवीसांनी मानले आभार
14
परकीयांनी आधी विध्वंस करून लुटले, तर नंतर आलेल्यांनी बुद्धीला लुटले: सरसंघचालक मोहन भागवत
15
राज्यात ९६ लाख खोटे मतदार; राज ठाकरेंचा आरोप, निवडणुका शांततेत हव्या तर मतदार याद्या स्वच्छ करा
16
नितीशकुमारच एनडीएचे सर्वसहमतीचे नेते असतील; अमित शाह यांच्या वक्तव्यानंतर जदयूचा दावा
17
काय सांगता! १८६ कार खरेदी, तब्बल २१ कोटींचा डिस्काऊंट दिला; ऑडी, BMW, मर्सिडिज घेतल्या
18
झामुमोने दिला ‘एकला चलो’चा नारा; महाआघाडी आता फुटीच्या उंबरठ्यावर, जागावाटपावरून मतभेद
19
बिहार निवडणूक २०२५: निवडणूक आयोगाची ‘आर्थिक गुप्तचर समिती’ ६ वर्षांनी पुन्हा सक्रिय
20
आरोपीच्या वकिलाने ५०० पानी अर्ज केला, न्यायालयाने जामीन फेटाळला; नेमके प्रकरण काय?

Corona Virus :...म्हणून आयसोलेशनमधील 'त्या' फुटबॉलपटूनं पत्नीच्या बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2020 16:12 IST

Corona Virusमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ला लिगा, बुंदेसलिगा, इंग्लिश प्रीमिअर लीग, सीरि ए इटालियन लीग, युरोपियन लीग २०२० आदी अनेक मोठ्या फुटबॉल स्पर्धांनाही त्याची झळ सोसावी लागली आहे.

Corona Virusमुळे अनेक क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. ला लिगा, बुंदेसलिगा, इंग्लिश प्रीमिअर लीग, सीरि ए इटालियन लीग, युरोपियन लीग २०२० आदी अनेक मोठ्या फुटबॉल स्पर्धांनाही त्याची झळ सोसावी लागली आहे.  युरोपमधील विविध क्लबच्या अनेक खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत आहे. कोरोना लागण झालेल्यांची संख्या झपाट्यानं वाढत चालली आहे. त्यामुळे अनेक क्लबमधील फुटबॉलपटूंना एकांतवासात जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

एकांतवासात गेलेल्या फुटबॉलपटूंचे मानसिक संतुलन ढासळत चालल्याचा दावा मानसोपचारतज्ज्ञ स्टीव्ह पोप यांनी केला आहे. इंग्लिश प्रीमिअर लीगचे सामने ४ एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहेत, तर चॅम्पियन्स लीग आणि युरोपा लीग रद्दच करण्यात आल्या आहेत. युरोपियन चॅम्पियनशीप २०२१पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे अनेक फुटबॉलपटूंना घरीच बसावे लागले आहे. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना एकांतवासाचा काही फरक पडलेला नाही. पण, ज्यांना सामने खेळल्यावरच पैसे मिळतात अशा फुटबॉलपटूंना मोठा भुर्दंड सोसावा लागत आहे. 

प्रीमिअर लीगमधील अनेक खेळाडू एकांतवासात आहेत. आर्सेनल क्लबचे प्रमुके मायकेल आर्तेटा आणि चेल्सीचा स्टार खेळाडू कॅलम हुडसन-ओडोई यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर फुटबॉलपटूंमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्यात एकांतवासात राहत असल्यामुळे त्यांचे मानसिक संतुलन ढासळत असल्याचे स्टीव पोप यांनी सांगितले. ''प्रीमिअर लीगमधील खेळाडूंमध्ये ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांना काही तणाव नाही. पण, त्यांना सेलिब्रेटी असल्याचं आता मिरवता येत नाही. त्यामुळे त्यांनाही काहीतरी चुकल्याचुकल्या सारखं वाटत आहे,'' असे पोप यांनी सांगितले.

ते पुढे म्हणाले,'' मला एका खेळाडूचा फोन आला आणि त्यानं मला तणावात आपण पत्नीच्या बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याचे सांगितले. काही खेळाडूंचे मानसिक खच्चिकरण झाले आहे. काही खेळाडू एकमेकांशी सतत फोनवरून संवाद साधत आहेत. एकमेकांना काय खावं, कसा सराव करावा याबबत सल्ले देत आहेत. काही खेळाडू नैराश्याच्या गर्तेत गेले आहेत.''

पोप यांनी त्या खेळाडूचं नाव मात्र गुपित ठेवले. ते म्हणाले,''अनेक खेळाडूंना त्यांच्या भविष्याची चिंता लागलेली आहे. आपल्याला पुन्हा खेळायला मिळेल की नाही, हा प्रश्न त्यांना सतावत आहे. काही खेळाडू ३३ वर्षांचे आहेत आणि त्यांना कारकिर्द संपुष्टात येईल असे वाटत आहे. त्यामुळे त्यांच्यातला मानसिक ताण वाढत आहे.''  हा एकांतवास आता त्यांना नकोसा वाटू लागला आहे आणि त्याला वैतागून एका फुटबॉलपटूनं स्वतःच्या पत्नीच्या बहिणीसोबत शरीरसंबंध ठेवल्याचे धक्कादायक कृत्य घडले. 

अन्य महत्त्वाच्या बातम्या

BCCI नं पर्याय शोधला; IPL 2020 होणार अन् धावांचा पाऊस पडणार, पण कधी?

Video : कोरोनाला हरवण्यासाठी Sachin Tendulkarची बॅटिंग; पाहा 'क्रिकेटचा देव' काय सांगतोय

#OnThisDay : सचिन तेंडुलकर युगाचा अंत अन् टीम इंडियाला गवसला नवा स्टार

... तर MS Dhoniचं टीम इंडियात पुनरागमन झालंच पाहिजे, माजी सलामीवीर सरसावला

दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूंना १४ दिवसांसाठी एकांतवासात जाण्याच्या सूचना

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFootballफुटबॉलSex Lifeलैंगिक जीवन